konkan railway

रोखठोक : कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची!

कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची! 

Aug 27, 2014, 11:45 PM IST

'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द

 ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झालाय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल होतायत. त्यातच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास कटकटीचा झालाय. आज अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत अाहेत. जनशताब्दी एक्सप्रेस ठाणे स्थानकात दोन तास रोखून धरण्यात आली होती.

Aug 27, 2014, 07:49 AM IST

कोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.

Aug 26, 2014, 02:10 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु

Aug 22, 2014, 10:44 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु; पहिल्याचं दिवशी 'विघ्न'

कोकण रेल्वेच्या मार्गावर आज पहिली डबल डेकर ट्रेन धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या ट्रेनसमोर समन्वयाच्या अभावाचं ‘विघ्न’ उभं राहिलं.  

Aug 22, 2014, 10:19 AM IST

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी तब्बल १२४ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ९0 रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहेत. यातील २ गाड्या या कोल्हापूरसाठी आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Jul 15, 2014, 11:09 AM IST

कोकण रेल्वे पोलिसांची अशीही दक्षता...

कोकण रेल्वेमध्ये तृतीय पंथीचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी एक वेगळीच घटना पुढे आली. घरातून पळालेला 14 वर्षीय शाळकरी मुलगा कोकण रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे त्या मुलाला आई-वडिलांकडे सोपविण्यात आले.

Jul 9, 2014, 03:40 PM IST

कोकण रेल्वे तिकिटात हेराफेरी, गौडबंगालची चौकशी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांचं रिझर्वेशन फुल्ल झालं होतं. यामध्ये गौडबंगाल असल्याचे पुढे येत आहे. तिकिट माफिया आणि दलाल यांचा हात असल्याची शक्यता आहे. या गौडबंगालच्या चौकशीचे आदेश देताच दोन दिवसात 250 आरक्षण करण्यात आलेली तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.

Jul 3, 2014, 01:14 PM IST

कोकण रेल्वेचे बुकिंग हाऊसफुल्ल

 बातमी गणेशोत्सवासंदर्भातली. कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे यापुढे तिकिट काढायला जाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

Jun 28, 2014, 11:05 PM IST

पावसाळ्याआधी कोकण रेल्वेची सुरक्षा चाचणी

 पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोकण रेल्वेच्या मार्गाची सुरक्षा पाहाणी केली जाते. यावर्षीही हा मार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र या चाचणीनंतरही मार्ग सुरक्षित असल्याचा दावा करताना कोकण रेल्वेने कोकणाची निर्सगाची साथ मिळावी, अशी अशा व्यक्त केलीय.

Jun 26, 2014, 10:05 PM IST