मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांचं रिझर्वेशन फुल्ल झालं होतं. यामध्ये गौडबंगाल असल्याचे पुढे येत आहे. तिकिट माफिया आणि दलाल यांचा हात असल्याची शक्यता आहे. या गौडबंगालच्या चौकशीचे आदेश देताच दोन दिवसात 250 आरक्षण करण्यात आलेली तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.
रिझर्वेशन सुरु होताच कोकणात जाणा-यांच्या त्यावर अक्षरशः उड्या पडल्या आणि कोकणात जाणा-या सगळ्या गाड्या भरुन गेल्यायत. दोन मिनिटात कोकण रेल्वेची 2500 तिकिटे संपली होती. पहिले तिकिट काढणाऱ्याला 300च्या जवळपास वेटींग मिळाले होते. त्यामुळे ही तिकिटे कशी संपली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती.
याबाबत भाजपचे नेते आमदार विनोद तावडे यांनी चौकशीची मागणी लावून धरली होती. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या रेल्वेचं रिझर्वेशन दोन मिनिचात कसे फुल्ल झालं, याची चौकशी करा, अशी मागणी तावडे यांनी केली होती. आसाम, पश्चिम बंगाल येथून तिकिटांचे आरक्षण करण्यात आल्याचे पुढे आले होते. तर कोकण रेल्वेने यामध्ये कोणताही घोळ नसल्याचे म्हटले आहे. आरक्षणामध्ये पारदर्शकता असल्याचे स्पष्ट केले होते.
इंटरनेटच्या माध्यमातून 20 टक्के तर 80 टक्के आरक्षण हे खिडकीवरुन उभे राहून करण्यात आलेय. यामध्ये तिकिट माफिया आणि दलाल यांचा हात असल्याची शक्यता आहे. याबात चौकशीचे आदेश दिल्यानंतर दोन दिवसात 250 तिकिटे परत करण्यात आली आहे. दरम्यान, आठवडाभरात चौकशी पू्र्ण होणार आहे. त्यामुळे यामागील गौडबंगाल बाहेर येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.