कोकण रेल्वेची सुरक्षा चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 08:08 PM ISTकोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर
1 जुलै 2014पासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या धावणार आहेत.
Jun 25, 2014, 07:31 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.
Jun 4, 2014, 05:46 PM ISTकोकण रेल्वे अपघात, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस
कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
May 5, 2014, 10:44 AM ISTतब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत
तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झालीय. नागोठणे इथं झालेल्या दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानंतर ही वाहतूक विस्कळीत झाली होतीय.
May 5, 2014, 07:53 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक सुरू...
तब्बल वीस तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालीय. मालगाडीचे डबे काढण्याचे काम पूर्ण झाले असून मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना करण्यात आलीय.
Apr 15, 2014, 08:14 AM ISTमालगाडी घसल्याने कोकण रेल्वे विस्कळीत, 6 ट्रेन लेट
कोकण रेल्वे मार्गावर आडवली आणि निवसर रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडी पटरीवरून घसरल्याने रेल्वे सेवा एक ते दोन तास ठप्प होती. याचा फटका सहा गाड्यांना बसला. त्यामुळे रेल्वे एक ते दोन तास उशिराने धावत आहेत.
Apr 11, 2014, 03:57 PM ISTचिपळूण-संगमेश्वरमध्ये भूकंप, कोकण रेल्वेला फटका
चिलीमध्ये ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असतानाच कोकणातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. चिपळूण, संगमेश्वर, कोयना, पाटण परिसरात भूकंप झाला. तर चिपळूण आणि उक्षी या कोकण रेल्वेच्या स्टेशन दरम्यान धक्के बसल्याने तीन एक्सप्रेस गाड्या थांबविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला.
Apr 2, 2014, 11:48 AM ISTकोकण रेल्वेचा प्रवास आता कूल कूल
कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी आणि उन्हाळा यापासून सुटका होण्यासाठी आता कोकण रेल्वेने जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एसी डबे जोडण्यात येणार आहेत. दादर-मडगाव-दादर जनशताब्दीला तीन तर दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणीला दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 2, 2014, 10:23 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन
गुढी पाडवानिमित्ताने कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर आहे. या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावेल.
Mar 27, 2014, 03:40 PM ISTकोकण रेल्वेला रो रो सेवेतून वर्षाला ५० कोटींचे उत्पन्न
कोकण रेल्वे मार्गावर १५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रोल ऑन रोल ऑफ म्हणजेच रो-रो सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सेवेच्या माध्यमातून कोकण रेल्वेला वर्षाला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पंतंगे यांनी दिली.
Jan 21, 2014, 01:05 PM ISTकोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर!
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई मडगांव या मार्गावर लवकरच डबल डेकर ट्रेन दिसण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
Dec 9, 2013, 09:45 PM ISTकॅन्सरग्रस्त मुलांना कोकण रेल्वेने घडविले गोवा दर्शन
आपल्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद-भरारी आणण्यासाठी कोकण रेल्वेने कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मुलांला गोवा दर्शन घडविले आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये ही मुलं सध्या उपचार घेत आहेत.
Nov 30, 2013, 10:25 AM ISTकोकण रेल्वेचा सतर्कता आठवडा
कोकण रेल्वेकडून सतर्कता आठवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनजागृती करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अनेक स्थानकांवर आणि कार्यालयात बॅनर आणि पोस्टर लावले गेले आहेत.
Nov 1, 2013, 07:34 AM ISTकोकण रेल्वेच्या हुतात्म्यांना मानवंदना
कोकण रेल्वेने १४ ऑक्टोबरला कोकण रेल्वे स्मृती दिवसानिमित्ताने रेल्वेच्या निर्मितीच्यावेळी अभियंते आणि कामगारांना आपले प्राण गमवावे लागलेल्यांना मानवंदना दिली. हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
Oct 15, 2013, 10:02 AM IST