islamabad

गरज पडल्यास आण्विक शस्त्रं वापरणार, पाकिस्तानची धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी आज धक्कादायक विधान केलंय. ते म्हणाले, 'आम्हाला स्वत:ला वाचविण्यासाठी आण्विक शस्त्रांचा वापर करावा लागला, तर तो ही करू'. 

Jul 8, 2015, 04:00 PM IST

पाकिस्तानात उष्णतेची लाट, १३६ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे, यात १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये शनिवार  हा दिवस सर्वांत उष्णतेचा ठरला. 

Jun 22, 2015, 09:29 PM IST

गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने ४ अटकेत

दोन जणांनी गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने, तसेच लग्नाला मदत केल्याने एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील ही घटना आहे.

Jun 17, 2015, 04:48 PM IST

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला पुन्हा अटक

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रहमान लखवी याला पाकिस्तान सरकारनं पुन्हा ताब्यात घेतल्यामुळं लख्वीचा तुरूंगवास अटळ आहे. लखवी याला सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचा पाकिस्तान सरकारचा आदेश हाय कोर्टानं काल निलंबित केला होता, त्यानंतर त्याची सुटका होणार होती. 

Dec 30, 2014, 11:30 AM IST

पाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी

दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Dec 22, 2014, 07:47 PM IST

काश्मीर हा पाकिस्तानचा भाग, इंच इंच जमीन आणणार - बिलावल

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो याने नविन वाद उभा केलाय. भारतातील काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. काश्मीरमधील एक एक इंच जमीन पुन्हा मिळविली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य केलेय.

Sep 20, 2014, 04:02 PM IST

इस्लामाबादेत पी-टीव्ही कार्यालयात आंदोलनकर्ते घुसले

सरकार विरोधात प्रदर्शन करणारे आंदोलक आता पाकिस्तानचं सरकारी चॅनेल, पी टीव्ही कार्यालयात घुसले आहेत. आंदोलकांनी पी-टीव्हीचं प्रसारण बंद केलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. 

Sep 1, 2014, 01:35 PM IST

पाकिस्तान हिंसा: प्रदर्शनकर्ते संसदेत, 8 ठार, 450हून अधिक जखमी

 गेल्या दोन आठवडय़ापासून संसद परिसरात धरणे देणाऱ्या इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या हजारो समर्थकांनी हातात लाठ्या घेत आणि कठडे तोडत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात 8 निदर्शक ठार झाले, तर 450हून अधिक निदर्शक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २५ पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती पाकिस्तानातील वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारनं संघर्षात्मक पवित्र घेत या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

Aug 31, 2014, 04:37 PM IST

‘खोडसाळ’पणावर भारताकडून पाकला चपराक!

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी काश्मीरमधल्या विभाजनवादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळं भारतानं पाकला सणसणीत चपराक लगावलीय. 

Aug 19, 2014, 10:49 AM IST

इस्लामाबाद सर्वात धोकादायक शहर

पेराल तसे उगवेल ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल... ही म्हण शेजारी देश पाकिस्तानला तंतोतंत लागू पडतेय... कारण पाकिस्तानची राजधानी असलेलं इस्लामाबाद हे शहर सगळ्यात धोकादायक शहर असल्याचा रिपोर्ट खुद्द पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानचं दिलाय...

Feb 20, 2014, 12:56 PM IST

पंचायतीचं फर्मान; ३० जणांचा विधवेवर बलात्कार

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात भावाचं प्रेम चुकीचं ठरवतं त्याच्या या चुकीची शिक्षा त्याच्या विधवा बहिणीला दिली गेली... आणि ही शिक्षा होती, ३० जणांचा तिच्यावर सामूहिक बलात्कार...

Jan 31, 2014, 11:49 AM IST

पुरूषांबरोबर नाच; चार महिलांना केले ठार

पाकिस्तानमध्ये विवाह सोहळ्यात पुरुषांबरोबर नृत्य करतानाचे मोबाईलवरील चित्रीकरण पाहून जिरगा आदिवासी जमातीच्या पंचायतीने महिलांना दोषी ठरवत त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आणि त्याची कारवाईही झाली. एका लग्न सोहळ्यात पुरुषांसोबत गाणे आणि नृत्य करणे चार महिलांसाठी जिवावर बेतले आहे.

Jun 4, 2012, 08:48 PM IST