‘खोडसाळ’पणावर भारताकडून पाकला चपराक!

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी काश्मीरमधल्या विभाजनवादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळं भारतानं पाकला सणसणीत चपराक लगावलीय. 

Updated: Aug 19, 2014, 10:49 AM IST
‘खोडसाळ’पणावर भारताकडून पाकला चपराक!   title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी काश्मीरमधल्या विभाजनवादी हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळं भारतानं पाकला सणसणीत चपराक लगावलीय. 

दोन्ही देशांदरम्यान २५ ऑगस्टला परराष्ट्र सचिव स्तरावर होणारी बैठक भारतानं तातडीनं रद्द केली आहे.

भारत किंवा विभाजनवादी नेत्यांपैकी एकाशीच द्वीपक्षीय चर्चा करा, असं  परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी बजावूनही पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी खोडसाळपणा केला आणि हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांनाही या बैठकीसाठी पाचारण केलं होतं. 

पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याच्या दिशेनं चर्चा सुरू करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला होता. मात्र, तरीही पाकिस्ताननं भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ सुरूच ठेवून थेट हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळं आता चर्चा करण्यात काहीही हशील नसल्याचा संदेश पाकिस्तानला भारतीय परराष्ट्र खात्यानं पाठवल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अकबरुद्दीन यांनी दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.