पाकिस्तान हिंसा: प्रदर्शनकर्ते संसदेत, 8 ठार, 450हून अधिक जखमी

 गेल्या दोन आठवडय़ापासून संसद परिसरात धरणे देणाऱ्या इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या हजारो समर्थकांनी हातात लाठ्या घेत आणि कठडे तोडत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात 8 निदर्शक ठार झाले, तर 450हून अधिक निदर्शक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २५ पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती पाकिस्तानातील वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारनं संघर्षात्मक पवित्र घेत या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

IANS | Updated: Aug 31, 2014, 04:40 PM IST
पाकिस्तान हिंसा: प्रदर्शनकर्ते संसदेत, 8 ठार, 450हून अधिक जखमी title=

इस्लामाबाद:  गेल्या दोन आठवडय़ापासून संसद परिसरात धरणे देणाऱ्या इम्रान खान आणि ताहीर ऊल कादरी यांच्या हजारो समर्थकांनी हातात लाठ्या घेत आणि कठडे तोडत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या शासकीय निवासस्थानाकडे चाल केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत केलेल्या गोळीबारात 8 निदर्शक ठार झाले, तर 450हून अधिक निदर्शक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २५ पोलिसांचाही समावेश असल्याची माहिती पाकिस्तानातील वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे सरकारनं संघर्षात्मक पवित्र घेत या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

मध्यरात्रीच्या सुमाराला निर्माण झालेल्या या गंभीर स्थितीमुळं इस्लामाबाद शहरातील अतिमहत्त्वाचा परिसर तणावग्रस्त बनला आहे. तणाव वाढताच पंतप्रधान शरीफ लाहोरकडे रवाना झाले आहेत. पाकिस्तान तेहरीक-ए- इन्साफचे नेते इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तेहरकीचे नेते ताहीर उल कादरी यांनी निदर्शनाचं ठिकाण बदलण्याची घोषणा करताच निदर्शक शरीफ आणि त्यांच्या सरकारविरोधी जोरदार घोषणा देत नॅशनल अॅसेम्ब्ली इथून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे चालते झाले. 

नॅशनल अॅसेम्ब्लीपासून 50 मीटर अंतरावर पंतप्रधान शरीफ यांचं निवासस्थान आहे. या रस्त्यावर कठडे म्हणून कंटेनर उभे करण्यात आले. ते हटविण्यासाठी निदर्शकांनी कटर्सचा वापर केला. आंदोलकांच्या संघर्षात्मक पवित्र्यामुळं निर्माण झालेल्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने फौज धाडली आहे. पोलिसांच्या गोळीबारात एक महिला ठार झाली.
माझ्या मागे या..

या मोर्चाचं नेतृत्व मी करणार असून माझ्या समर्थकांनी माझ्या मागे यावं. मी सांगत नाही तोवर महिला आणि मुलांनी आहे तिथंच थांबावं, असं आवाहन इम्रान खान यांनी करताच त्यांच्या समर्थकांनी तयारीनिशी शरीफ यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं कूच केलं. 

आंदोलनाचं लोण कराचीपर्यंत.. 

इस्लामाबादमध्ये रस्त्यावर उतरलेल्या हजारो आंदोलनकर्त्यांचे लोण मध्यरात्री कराची आणि लाहोरपर्यंत पोहोचलं. कराची आणि लाहोरमध्येही शेकडो जणांनी रस्त्यावर उतरून इस्लामाबाद इथल्या घटनेचा निषेध करत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

सैन्याला पाचारण .. 

इस्लामाबाद इथं सुरू झालेल्या विरोध प्रदर्शनाचं लोण कराची, लाहोरपर्यंत पोहोचलं. हे विरोध प्रदर्शन मोडून काढण्यासाठी सरकारनं पाकिस्तानी सैन्याला पाचारण केलं आहे. 
दरम्यान, पाकिस्तानमधील परिस्थिती ही लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.