पाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी

दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Updated: Dec 22, 2014, 07:47 PM IST
पाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी title=

इस्लामाबाद : दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात १३३ विद्यार्थ्यांसह १४९ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सरकारने फाशीवरील स्थगिती उठविली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाचा नायनाट करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय, प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निकाल लावण्याचे आदेश दिले आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'अंतर्गत कारभार मंत्रालय दहशतवाद्यांच्या प्रलंबित यादीवर काम करत आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दहशतवाद्यांना येत्या काही आठवडाभरात फाशी देण्यात येईल.'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.