इस्लामाबाद: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी आज धक्कादायक विधान केलंय. ते म्हणाले, 'आम्हाला स्वत:ला वाचविण्यासाठी आण्विक शस्त्रांचा वापर करावा लागला, तर तो ही करू'.
एक पर्याय म्हणून आण्विक शस्त्राचा वापर केला जावू शकतो. हे शस्त्र केवळ दाखविण्यासाठी नाहीय. मात्र अस्तित्त्वावर आलं तर संकटांचा सामना करण्यासाठी आहेत.
आसिफ सोमवारी म्हणाले, 'आपल्याला ही प्रार्थना करायला हवी की, अशी परिस्थिती समोर येवू नये की आपल्याला याचा वापर करावा लागेल. मात्र जर आम्हाला आपलं अस्तित्त्व वाचविण्यासाठी याची गरज असेल तर आम्ही त्याचा वापर करू.'
भारतावर प्रॉक्सी युद्धाचा आरोप
आसिफ यांनी भारतावर पाकिस्तानात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दहशतवाद वाढवत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, भारताचं हे पाऊल पाकिस्तानासोबत प्रॉक्सी युद्ध केल्यासारखं आहे. पाकिस्तानचं संरक्षण मंत्रालय मजबूत असण्यावर त्यांनी जोर दिला.
आता पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्यावर भारताची काय भूमिका असेल हे पाहावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.