fare

एअर इंडियाचा मान्सून धमाका, 1777 रुपयांत हवाई सफर

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियानं भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर दिलीय. 

Jun 10, 2015, 02:54 PM IST

रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना 'उल्लू' बनवलं!

 रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नसल्याचं जाहीर केल्यानं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला होता खरा... मात्र, हा दिलासा थोडाच काळ टिकलाय. 

Mar 3, 2015, 10:04 AM IST

अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं करा विमान प्रवास!

आता अवघ्या ९०८ रुपयांमध्ये जेट एअरवेजनं विमान प्रवास करू शकता. विमान सेवा देणाऱ्या कंपनीनं नुकतीच ही घोषणा केलीय. मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा आणि एअर एशियाचं बजेट विमान भाडं याचा मुकाबला करण्यासाठी जेट एअरवेजनं सर्व मार्गांवर आपल्या तिकीटांच्या किमती कमी केल्या आहेत. 

Sep 24, 2014, 12:08 PM IST

सुवर्ण संधी! स्पाइस जेटकडून विमान प्रवासाची खास ऑफर

 सणासुदीच्या हंगामात फिरायला जाण्याचा विचार करत आहात. तर मग तुमच्यासाठी स्पाइसजेटनं एक चांगली ऑफर आणली आहे. स्पाइसजेटनं प्रवासासाठी आता कमीत कमी भाडं १,८८८ रूपये ठेवलंय. 

Aug 25, 2014, 02:14 PM IST

रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागणार आहे, कारण हायकोर्टाने रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला हिरवा कंदिल दिला आहे. 

Aug 12, 2014, 06:32 PM IST

स्पाईसजेटची ऑफर, तिकिट केवळ 1,999 रुपयांत!

माफक दरांत विमान प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या स्पाईस जेट विमान कंपनीनं प्रेक्षकांसमोर आपली आणखी एक नवीन योजना सादर केलीय.

Jun 18, 2014, 08:36 AM IST

भाडे नाकारलं तर याद राखा?

टॅक्सी आणि रिक्षावाल्यांची यापुढे भाडं नाकारलं अथवा प्रवाशांशी उद्धट वर्तन केलं तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. गैरवर्तन करणाऱ्या चालकांचा परवाना निलंबित करून दंडात्मक कारवाई करणाचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

Oct 6, 2012, 11:56 AM IST

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेत भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला.

Oct 5, 2012, 12:54 PM IST

रिक्षा-टॅक्सी भाडे वाढीचा बोजा

मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेतला. रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 29, 2012, 03:12 PM IST

मुंबईत रिक्षा महागली

परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे भाडे आता १२ रूपये झाले आहे. रिक्षाचालक संपावर गेले तर परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा संप होणार की नाही, याची चर्चा आहे.

Apr 14, 2012, 08:28 AM IST

मुजोर रिक्षाचालकांचा संप कायम

मीरारोडमध्ये मुजोर रिक्षाचालकांनी सलग चौथ्या दिवशीही बंद पुकारला आहे.आरटीओनं रिक्षा प्रवासी वाहतूकीचं नविन दरपत्रक जारी केलं होतं. मात्र हे दरपत्रक मान्य नसल्यानं कोणतीही पूर्वसुचना न देता रिक्षाचालकांनी बंद पुकारला.

Mar 3, 2012, 06:17 PM IST

राज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम

महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.

Mar 2, 2012, 08:16 AM IST