नवी दिल्ली: सणासुदीच्या हंगामात फिरायला जाण्याचा विचार करत आहात. तर मग तुमच्यासाठी स्पाइसजेटनं एक चांगली ऑफर आणली आहे. स्पाइसजेटनं प्रवासासाठी आता कमीत कमी भाडं १,८८८ रूपये ठेवलंय.
सणाच्या हंगामाची ही ऑफर २७ ऑगस्ट २०१४ पर्यंत बुकिंग करणाऱ्यांसाठी असणार आहे.
स्पाइसजेटची ही ऑफर देशांतर्गत प्रवास करणाऱ्य़ासाठी असून हा प्रवास तुम्ही २५ सप्टेंबर २०१४ ते १५ जानेवारी २०१५ दरम्यान करु शकतात.
या ऑफर अंतर्गत तुम्ही तिकीट बुकींग केल्यानंतर तुम्ही त्यात बदल करु शकणार नाही आणि बुकींग रद्द केल्यास बुकींगची रक्कमही तुम्हाला परत मिळणार नाही. ही ऑफर मर्यादित असून प्रथम येणाऱ्य़ास प्रथम प्राधान्य या तत्वावर असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.