रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना 'उल्लू' बनवलं!

 रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नसल्याचं जाहीर केल्यानं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला होता खरा... मात्र, हा दिलासा थोडाच काळ टिकलाय. 

Updated: Mar 3, 2015, 10:04 AM IST
रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांना 'उल्लू' बनवलं! title=

मुंबई :  रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ नसल्याचं जाहीर केल्यानं प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला होता खरा... मात्र, हा दिलासा थोडाच काळ टिकलाय. 

कारण, रेल्वेमत्र्यांच्या घोषणांमधली लबाडी अखेर प्रवाशांसमोर आलीच. अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेट सादर करताना प्रत्यक्ष रेल्वेच्या तिकीट दरांत वाढ केली नसल्याचं मोठ्या तावात सांगितलं तरी ही वाढ होणारच, हे अटळ होतं.

कारण, जेटलींनी सादर केलेल्या सर्वसाधारण बजेटमध्ये सेवाकर वाढवल्याचं जाहीर केलं होतं. त्याचीच झळ फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना बसणार आहे.  फर्स्ट क्लासच्या तिकिटांत ५ ते १० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 

अर्थसंकल्पात सेवाकर १२.३६  टक्क्यांवरुन १४ टक्के करण्यात आल्यानं फर्स्ट क्लासच्या तिकिटांबरोबरच मासिक पासही वाढणार अल्याची शक्यता आहे. 

रेल्वे ही काही नफा कमावणारी संस्था नसल्यानं एकूण सेवाकरात रेल्वेला ७० टक्के सूट देण्यात येते. त्यामुळे १२.३६ पैंकी फक्त ३.७० टक्केच सेवाकर लागला जात होता. मात्र, एकूण सेवाकरात वाढ झाल्यानं प्रवाशांना त्याची थोडी का होईना पण झळ बसणारच! 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.