रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ

रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागणार आहे, कारण हायकोर्टाने रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला हिरवा कंदिल दिला आहे. 

Updated: Aug 12, 2014, 06:32 PM IST
रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ title=

मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागणार आहे, कारण हायकोर्टाने रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला हिरवा कंदिल दिला आहे. 

रिक्षाचे किमान भाडे आता 17 रूपये असेल, तर टॅक्सीचे किमान भाडे 21 रूपये असेल, हा नवीन दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. मात्र मीटर रिकॅलीब्रेट असणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सींनाच लागू होणार आहे.

रिकॅलेब्रेट नसणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सींना जुन्या दरानेच भाडे स्वीकारावे लागणार आहे. जुन्या दराने टॅक्सीचं किमान भाडं 19 रूपये आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.