मायावतींनी केली निवडणूक रद्द करण्याची मागणी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे. इव्हीअम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप मायवतींनी केला. कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत जात होतं असा आरोप त्यांनी केला आहे. मायावतींच्या पक्षाचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे.
Mar 11, 2017, 02:37 PM ISTउत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.
Mar 8, 2017, 08:58 AM ISTउत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह
सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.
Mar 7, 2017, 11:47 AM ISTरोड शो आधी गढवाघाट आश्रमात पोहोचले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन दिवसांपासून वाराणसीमध्ये आहेत. आज ते पुन्हा एकदा रोड शो करणार आहेत. पण त्याआधी सकाळी ते गढवाघाट आश्रम पोहोचले. तेथे त्यांनी गायींना चारा खाऊ घातला.
Mar 6, 2017, 11:54 AM ISTडिंपल यादव यांनी केलं भाजप आणि बसपाला लक्ष्य
उत्तर प्रदेश निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव यांची जौनपूरमध्ये सभा पार पडली. या सभेत भाजप आणि बसपाला लक्ष्य करताना डिंपल यादव यांनी एका दग मारले डात दोन पक्षीआहेत.
Feb 27, 2017, 10:16 AM ISTस्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTशरद पवारांचे नातू रोहित पवार यांचा विजय
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित राजेंद्र पवार यांना यश मिळालंय.
Feb 23, 2017, 05:45 PM ISTमतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता?
आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 21, 2017, 06:17 PM ISTमुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ?
मुंबईत कोणाला मिळणार किती जागा ?
Feb 21, 2017, 06:06 PM ISTबॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान
मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.
Feb 21, 2017, 05:39 PM ISTपवारांची नात आणि सुप्रिया सुळेंच्या मुलीने पहिल्यांदा केलं मतदान
रेवती हिने देखील आजोबांसोबत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.
Feb 21, 2017, 04:15 PM ISTआधी लगीन मतदानाच म्हणत नवरदेव मतदान केंद्रात
21 फेब्रुवारीला लग्नाचे बरेच मुहूर्त होते. पण बहुतेक सगळ्या नवरदेवांनी लग्नाच्या आधी मतदान केंद्र गाठलं. परळ, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये आधी लगीन मतदानाचं म्हणत मुंडावळ्या बांधलेले नवरदेव मतदान केंद्रात पोहोचले.
Feb 21, 2017, 12:27 PM ISTराज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सोबतच पैशा जिंकतो की काम असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Feb 21, 2017, 11:18 AM IST...तर मग शरद पवारांनी कोणाला मतदान केलं ?
मग शरद पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं
Feb 21, 2017, 10:43 AM ISTमतदान करा फरक पडतो: आम्हाला पाठवा तुमचा मतदान 'सेल्फी'
आपल्या देशाचं खरं आभूषण असणाऱ्या लोकशाहीचा सण साजरा करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. राज्यात आज 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदा आणि 118 पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतंय. सकाळी साडे सातवाजता या उत्सावाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदार राजाला आपला हक्क बजावता येणार आहे. पण गेल्या काही दिवसात मतदार राजा या उत्सवाकडे पाठ फिरवतोय.
Feb 21, 2017, 09:50 AM IST