मुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ?

मुंबईत कोणाला मिळणार किती जागा ?

Updated: Feb 21, 2017, 06:30 PM IST
मुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ? title=

मुंबई : मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या मनपा निवडणुका आज पार पडल्या. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, उल्हासनगर या ठिकाणी मतदान झालं. मुंबईत साडे पाच वाजेपर्यंत 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होण्याची शक्यता आहे. तर इतर शहरांमध्येही मतदानाचा टक्का वाढण्याची चिन्ह आहेत. पहिल्यांदाज युती आणि आघाडीतले पक्ष स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळं जनतेला पर्याय उपलब्ध झाले असल्यामुळं मतदानाचा टक्का वाढल्याची चर्चा आहे.

बीएमसी निवडणुकवर सट्टेबाजांचं देखील लक्ष लागून आहे. मुंबई निवडणुकीवर ३ हजार कोटींचा सट्टा लागला आहे. बुकींच्या मते कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे पाहा.

१. शिवसेना -

जागा मिळतील - ९५ ते १००
भाव - १ रुपयाला २५ पैसे

२. भाजप

जागा मिळतील - ५० ते ७०
भाव - १ रुपयाला ३४ पैसे

जर भाजपाला बहुमत मिळाले तर १ रुपायाला २ रुपये ४० पैसे मिळतील.
भाजपला कमीत कमी ५० जागा मिळतील असा बुकींचा अंदाज आहे

३. काँग्रेस

जागा मिळतील - २५ ते ३०
भाव - १ रुपयाला २ रुपये २० पैसे

४. राष्ट्रवादी 

जागा मिळतील - १२ ते १५
भाव - १ रुपयाला १ रुपये १० पैसे

मनसे यंदा सट्टेबाजांच्या लिस्ट मध्येच नाही आहे.