राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सोबतच पैशा जिंकतो की काम असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

Updated: Feb 21, 2017, 12:41 PM IST
राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सोबतच पैशा जिंकतो की काम असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

राज ठाकरेंसोबत मातोश्री कुंदा ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. दादरच्या प्रभाग क्रमांक 191मध्ये मनसेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे मैदानात आहेत. स्वप्ना देशपांडे माजी नगरसेवक आणि मनसे गटनेते संदीप देशपांडेच्या पत्नी आहेत.