demonitisition

नोटबंदीनंतर आता डिजीटल नोट आणण्याच्या तयारीत सरकार?

सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Dec 5, 2018, 07:26 PM IST

नोटबंदीनंतर सीबीआयने ७७ प्रकरणांवर केली कारवाई

नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर बँका, पोस्ट ऑफिस, रेल्वे आणि विमा कंपन्यांमध्ये 77 प्रकरणांची नोंद झाली आहे जेथे काळा पैसा जमा केला गेला आहे.

Nov 8, 2017, 04:26 PM IST

नोटबंदीनंतर आता सरकार याविरोधात उचलणार पुढचं पाऊल

नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काळा दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे. तर सरकार सरकारमधील इतर पक्षांनी 'अँटी ब्लॅक मनी' दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पंतप्रधान मोदी नोटबंदीनंतरचं एक वर्ष आणि पुढची रणनीती याबाबत 8 नोव्हेंबरला मोठी घोषणा करण्याची तयारी करत आहे.

Nov 7, 2017, 09:17 AM IST

पंतप्रधान मोदींची 'मन की बात', नोटबंदीवर भाष्य करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज आकाशवाणीवर 37 वा मन की बात कार्यक्रम असेल. सकाळी 11 वाजता असण्या-या मन की बात कार्यक्रमात मोदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. या मन की बातमध्ये नोटाबंदीवर देखील भाष्य करण्याची शक्यता आहे.

Oct 29, 2017, 09:39 AM IST

नोटबंदीचा आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम

नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेली झळ आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम करेल असं भाकित स्टेट बँकेनं वर्तवलं आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम आत्ताच सांगता येणं कठीण आहे. पण येत्या काही महिन्यात मात्र अर्थव्यवस्था शैथिल्य कायम राहिल असं बँकेच्या एका माहितीपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Jun 12, 2017, 03:38 PM IST

नोटबंदीनंतर जमा झाला ६ हजार कोटींचा टॅक्स

काळ्या पैशांविरोधात कारवाईत एसआयटीने ६ हजार कोटी रुपये टॅक्सच्या रुपात जमा केले आहेत. ही संख्या अजून वाढू शकते असं एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Mar 18, 2017, 11:18 AM IST

भाजप जिंकला तर मोदी घेणार नोटबंदी सारखे मोठे निर्णय

नोटबंदीनंतर पाच राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या. आज पाचही विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. सगळ्याच एग्जिट पोल्समध्ये भाजपला ५ पैकी ४ राज्यांमध्ये मोठं यश मिळेल असं समोर येत आहे. 

Mar 11, 2017, 08:54 AM IST

आजपासून बँकेतून काढता येणार आठवड्याला 50 हजार

आजापासून बचत खात्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून एका आठवड्यात आता 50 हजार रुपये काढू शकणार आहात. याआधी ही मर्यादा 24 हजार रुपये होती. आरबीआयने 8 फेब्रुवारीला याबाबत घोषणा केली होती. 

Feb 20, 2017, 10:20 AM IST

आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांवर शक्तीचा दुरूपयोग केल्याचा ठपका

संसदेच्या लोकलेखा समितीने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना नोटाबंदी संदर्भात प्रश्न विचारले.

Jan 9, 2017, 04:27 PM IST

राष्ट्रवादीचं बँक ऑफ इंडिया समोर म्हशी बांधून आंदोलन

आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी बँकेसमोर आणलेल्या म्हशी बँकेमध्ये घुसवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून आंदोलकांना रोखलं. त्यामुळं पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये झोंबाझोंबी झाली.

Jan 9, 2017, 03:55 PM IST

खूशखबर! मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार इतके पैसे

केंद्र सरकार देशवासियांना एक खूशखबरी देऊ शकते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात एक रक्कम सरकारकडून जमा केली जाऊ शकते. 

Jan 5, 2017, 01:25 PM IST

५०० च्या नव्या नोटांसंदर्भात आरबीआयची नवी घोषणा

नोटबंदींनंतर लोकांना रोख रक्कम संबंधित अडचणी सहन करावी लागली. अनेकांनी यानंतर देखील नवीन चलन मोठ्या प्रमाणात जमा करुन ठेवला. अनेकांनी काळा पैसा पांढरा देखील करण्याचा प्रयत्न केला. पण आता आरबीआयने यासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे.

Jan 4, 2017, 11:09 AM IST

नोटबंदीनंतर केली असेल खरेदी तर येणार अडचणीत

८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Jan 2, 2017, 02:17 PM IST