नोटबंदीनंतर आता डिजीटल नोट आणण्याच्या तयारीत सरकार?

सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Updated: Dec 5, 2018, 07:26 PM IST
नोटबंदीनंतर आता डिजीटल नोट आणण्याच्या तयारीत सरकार? title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर आता केंद्र सरकार आर्थिक विकास सुधारण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय़ घेणार असल्याची चर्चा आहे. सरकार लवकरच कागदी नोट ऐवजी डिजीटल नोट आणण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याचं काम देखील खूप जलद गतीने सुरु असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या संदर्भात आर्थिक विभागाचे सचिव यांच्या नेतृत्वात एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीने एक ड्राफ्ट तयार केला असून तो केंद्र सरकारला देखील सोपवण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, सरकारला डिजीटल नोट लॉन्च करण्यासाठी गंभीरपणे विचार केला पाहिजे. सरकारला फिजिकल रुपयांसोबत इलेक्ट्रॉनिक नोट देखील आणले पाहिजे असं देखील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे बिटकॉइन सारख्या वर्चुअल करेंसी सारख्या फसवणुकीच्या घटना रोखण्यात सरकारला मदत होईल.

डिजीटल नोट जारी केल्याने आणि त्याच्या व्यवहारांवर आरबीआयचा संपूर्ण कंट्रोल असेल. मीडिया रिपोर्टनुसार या रिपोर्टवर अर्थ मंत्रालय लवकरच आरबीआयसोबत चर्चा करणार आहे. यानंतर पीएमओ सोबत बैठक घेऊन यावर निर्णय घेतला जाणार आहे.

चलनमध्ये डिजीटल करंसी आल्याने अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळतील. यामुळे काळ्यापैशांवर देखील लगाम लागेल. मॉनिटरी पॉलिसी पासून कर्ज घेणे आणि मनी ट्रांजॅक्शनच्या नियमात देखील बदल होतील. यामुळे पारदर्शकता वाढेल.

समितीच्या मते, डिजीटल करंसीला डिजीटल लेजर टेक्नलॉजी नुसार लागू केलं गेलं पाहिजे. यामुळे विदेशात देखील व्यवहार करताना अडचणी येणार नाहीत. यामुळे बिटकॉईन सारखे फसवणुकीचे प्रकार देखील बंद होतील.

डिजीटल नोट 2 कॅटेगरीमध्ये जारी करण्याचा विचार आहे. एकावर व्याज दिलं जाणार आहे तर दुसऱ्यावर फक्त घेवान-देवान करता येईल.