नवी दिल्ली : काळ्या पैशांविरोधात कारवाईत एसआयटीने ६ हजार कोटी रुपये टॅक्सच्या रुपात जमा केले आहेत. ही संख्या अजून वाढू शकते असं एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ८ नोव्हेंबरला ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आयकर विभागाने त्या लोकांची माहिती मागितली होती ज्यांनी दुसऱ्यांच्या खात्यात पैसे ठेवले होते. अनेक लोकांनी शिक्षा होऊ नये म्हणून एमनेस्टी स्कीमनुसार त्यांची अघोषित संपत्तीवर दंडासह टॅक्स भरला आहे. केंद्र सरकारने आता तो वाढवून ७५ टक्के केला आहे.
नोटबंदीनंतर ५० लाखापेक्षा अधिक पैसे जमा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात आली होती. अशा लोकांना इमेल पाठवण्यात आले आहेत. अनेकांनी शिक्षेपासून बचावासाठी दंडासह टॅक्स भरला आहे. ५० लाख रुपये जमा करणाऱ्या 1092 लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अधिकारी प्रत्येक प्रकारचे व्यवहार तपासात आहे. अशा व्यक्तींची मागच्या तीन वर्षांची बॅलेंसशीट देखील तपासत आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक वर्षाच्या उत्पन्नाची माहिती मागवण्यात आली आहे.
ओडिशामध्ये एका डिविजनल फॉरेस्ट ऑफिसरने 2.5 कोटी रुपये जमा केले आहेत. ज्यांना पैशांबाबत योग्य माहिती नाही देता आली तर अशा लोकांचा पैसा जप्त केला जाणार आहे.