death

महाराष्ट्राचा जनाधार असलेला नेता हरपला

भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.

Jun 3, 2014, 09:30 AM IST

मुंडेच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का - गडकरी

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन हा पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते... महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली.

Jun 3, 2014, 09:19 AM IST

मोबाईलनं घेतला तरुणाचा जीव

रेल्वेमार्गावर पडलेला आपला मोबाईल उचलण्याच्या नादात एक 18 वर्षीय तरुणानं आपला जीव गामवलाय.

May 9, 2014, 03:39 PM IST

रेल्वे प्लॅटफॉर्म अंतराचा आणखी एक बळी, अधिकाऱ्याचाच मृत्यू

रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यात असलेल्या जास्त अंतरानं आणखी एक बळी घेतलाय. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवर हा अपघात झालाय. यात रेल्वेचे असिस्टंट स्टेशन मास्तर आशिष कुमार चौधरी यांचा मृत्यू झालाय

May 9, 2014, 11:43 AM IST

कॅमिला पार्कर यांच्या बंधुंचे निधन

डचेज ऑफ कॉर्नवाल कॅमिला पार्कर यांचे भाऊ मार्क शॅंड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर अंतिम संस्कार लंडन येथे करण्यात आले.

May 2, 2014, 08:15 AM IST

सनीच्या रॅलीत तरूणाचा मृत्यू

बॉलीवुड स्‍टार सनी देओलने पंजाबमधील अकाली-भाजपचे उमेदवार सुखदेव सिंह ढिंडसा यांच्यासाठी प्रचार केला.

Apr 28, 2014, 05:16 PM IST

छोट्या पडद्यावरील `कुंभकर्ण` राकेश दीवानांचं निधन

2008-09मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका `रामायण`मध्ये कुंभकर्णची भूमिका करणारे अभिनेते राकेश दीवाना यांचं दुर्दैवी निधन झालंय. दुर्दैवी यासाठी कारण त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे त्यांची चरबी नाही तर त्यासाठी केलेलं ऑपरेशन ठरलं.

Apr 28, 2014, 10:34 AM IST

तीन वर्षीय मुलीकडून फायरिंग लहान भावाचा बळी

अमेरिकेतील एक धक्कादायक घटना. अवघ्या 3 वर्षांच्या मुलीकडून चुकून बंदुकीची गोळी सुटली. या सुटलेल्या गोळीने तिच्याच दोन वर्षांच्या भावाचा जीव घेतला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांना धक्का बसलाय. ही घटना उताहमधील काचे काउंटीमध्ये घडली.

Apr 22, 2014, 12:36 PM IST

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

Apr 20, 2014, 03:41 PM IST

पद्मसिंह पाटलांच्या ताफ्याखाली चिरडून मुलीचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीच्या आधीच एका निष्पाप आणि कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावं लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा प्रचार सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.

Apr 8, 2014, 04:55 PM IST

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांचं निधन

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. मुलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Apr 7, 2014, 04:31 PM IST

उमरग्यात भीषण अपघातात न्यायाधिशांसह दोघांचा मृत्यू

लातूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. उमरग्याजवळ हा भीषण अपघात झाला. हे लोक लातूरहून गुलबर्गा इथं जात असतांना गाडीचे टायर फुटून हा अपघात झाला. विश्वास गोंधपूरे आणि गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Apr 1, 2014, 10:21 AM IST

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

ठाण्यातल्या समतानगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीला भीषण आग लागलीय. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागलीय. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून इमारतीत काहीजण अडकले आहे.

Mar 16, 2014, 09:07 AM IST

कवी-गीतकार सुधीर मोघे यांचं निधन

ज्येष्ठ कवी - गीतकार सुधीर मोघे यांचं पुण्यात निधन झालंय. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळतनकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव अशा सुमारे ५० हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखनाचं काम केलंय.

Mar 15, 2014, 03:17 PM IST

`स्कायडायव्हिंग` करताना पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा मृत्यू

`स्कायडायव्हिंग` करताना पुरेशी काळजी न घेतल्यानं एका २६ वर्षीय विवाहीत तरुणीला आपल्या प्राणांना मुकावं लागलंय. तामिळनाडूच्या सालेम भागात गुरुवारी ही घटना घडलीय.

Jan 31, 2014, 11:00 AM IST