मुंडेच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का - गडकरी

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन हा पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते... महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 3, 2014, 09:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
`भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन हा पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते... महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. देशातही त्यांनी खूप चांगलं काम केलं. महाराष्ट्राच्या राजकारणालाही हा खूप मोठा धक्का आहे` अशी प्रतिक्रिया भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीय.
गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांना सफदरजंग हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं... त्यांच्या शरीरावर कुठलीही जखम झाली नव्हती. पण, गाडीला अपघात झाल्यानंतर मुंडे यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. सिक्युरिटी गार्ड नायर यांना त्यांनी पाणी मागितलं आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी सांगितलं... खूप गंभीर परिस्थितीत त्यांना हॉस्पीटलमध्ये आणलं गेलं होतं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले... पण, सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केलं...
12.30 वाजता त्यांचं पार्थिव भाजपच्या ऑफिसमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची मुलगी, जावई आणि कुटुंबीय यांना या अपघाताबद्दल कळवण्यात आलंय... ते सध्या दिल्लीला येण्यासाठी निघालेत. दिल्लीतून मुंडे यांचं पार्थिव लातूर विमानतहून मराठवाड्यातील परळीमध्ये नेण्यात येईल. तिथंच गोपीनाथ मुंडेंवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याबाबतीत सूचित करण्यात आलंय, अशी माहिती गडकरी यांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.