रेल्वे प्लॅटफॉर्म अंतराचा आणखी एक बळी, अधिकाऱ्याचाच मृत्यू

रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यात असलेल्या जास्त अंतरानं आणखी एक बळी घेतलाय. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवर हा अपघात झालाय. यात रेल्वेचे असिस्टंट स्टेशन मास्तर आशिष कुमार चौधरी यांचा मृत्यू झालाय

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 9, 2014, 11:43 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यात असलेल्या जास्त अंतरानं आणखी एक बळी घेतलाय. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवर हा अपघात झालाय. यात रेल्वेचे असिस्टंट स्टेशन मास्तर आशिष कुमार चौधरी यांचा मृत्यू झालाय.
मुळचे बिहार मधील सीतामढी जिल्ह्यातले आशिष चौधरी गेल्या चार वर्षांपासून वाणगावचे असिस्टंट स्टेशन मास्तरपदी कार्यरत होते. बुधवारी लग्नाचा वाढदिवस असल्यानं सकाळची ड्युटी संपवून ते पत्नी सुगंधा आणि दोन लहान मुलांसह बोईसर इथं खरेदीसाठी आले होते.
दरम्यान गाडीत चढताना चौधरींचा तोल गेला आणि फलाट आणि गाडी यांच्यातील जागेतून ते खाली ट्रॅकवर पडले. अंगावरून गाडी गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आशीष चौधरी यांच्या मृत्यूमुळं रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यातील वाढत्या अंतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.