cm devendra fadanvis

राष्ट्रवादीला पाणी पाजणार, बारामतीत मुख्यमंत्र्यांची गर्जना

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची सभा

Dec 11, 2016, 08:45 AM IST

मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.सकाळी अकराच्या सुमाराला ते लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहतील. 

Dec 10, 2016, 08:25 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 

Dec 9, 2016, 07:26 PM IST

मुख्यमंत्र्यांनी दिली जिल्हा बँकांना खुशखबर

नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांना भेडसावणाऱ्या समस्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याशी चर्चा केली.

Dec 8, 2016, 10:50 PM IST

जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री चेन्नईला जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूच्या मुखयमंत्री जयललिता यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं आहे. जयललितांचं निधन ही दुख:द घटना असून त्यांच्या निधनानं मोठं राजकीय नुकसान झालं असून तामिळनाडूच्या जनतेच्या दु:खात महाराष्ट्र सोबत आहे अशी प्रतिक्रीया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

Dec 6, 2016, 12:19 PM IST

फडणवीस सरकारला डोरेमॉन म्हणणारे स्वत: मोगली, मुख्यमंत्र्यांची टीका

सोमवारपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सरकारला डोरेमॉन म्हणणारे विरोधक मोगली असल्याची खोचक टीकाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 

Dec 4, 2016, 07:20 PM IST

मुख्यमंत्र्यांना निवडणूक निकालाने फायदा

राज्यातील नगरपालिका निवडणुकींच्या निकालाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपामधील स्थान अधिक पक्के झाले असून त्यांच्या नेतृत्वावर या निकालाने शिक्कामोर्बत केले आहे. 

Nov 29, 2016, 08:02 PM IST

विदर्भात भाजपचं वर्चस्व, मुख्यमंत्र्यांच्या गावी भाजपची सत्ता

विदर्भामध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपची सरशी दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव असलेल्या चंद्रपूरच्या मूलमध्ये 17 पैकी 16 जागा भाजपनं जिंकल्या. 

Nov 28, 2016, 03:14 PM IST

नगरपरिषद निवडणुकीसाठी रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांचा प्रचार

आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीत प्रचार केला. गेल्या 50 - 60 वर्षांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं. मात्र, शहरीकरणासाठी आधीच्या सरकारनं कुठलीच योजना आखली नसल्याचं सांगत, त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

Nov 20, 2016, 04:10 PM IST