जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री चेन्नईला जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूच्या मुखयमंत्री जयललिता यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं आहे. जयललितांचं निधन ही दुख:द घटना असून त्यांच्या निधनानं मोठं राजकीय नुकसान झालं असून तामिळनाडूच्या जनतेच्या दु:खात महाराष्ट्र सोबत आहे अशी प्रतिक्रीया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

Updated: Dec 6, 2016, 12:19 PM IST
जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री चेन्नईला  जाणार title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूच्या मुखयमंत्री जयललिता यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं आहे. जयललितांचं निधन ही दुख:द घटना असून त्यांच्या निधनानं मोठं राजकीय नुकसान झालं असून तामिळनाडूच्या जनतेच्या दु:खात महाराष्ट्र सोबत आहे अशी प्रतिक्रीया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अंत्यदर्शनाला चेन्नईला जाणार असल्याचं कळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून चेन्नईसाठी रवाना झालेत. दुपारी चार वाजता अंत्यसंस्कारांना ते हजर असतील. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधीदेखील अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.