मनसेचे मालेगावनंतर चंद्रपुरात खाते

मालेगाव पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता चंद्रपूरमध्येही पालिकेत प्रवेश केल्याने महाराष्ट्रात मनसेची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Updated: Apr 16, 2012, 12:20 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर

मालेगाव पालिका निवडणुकीत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता चंद्रपूरमध्येही पालिकेत प्रवेश केल्याने महाराष्ट्रात मनसेची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील पाच पालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा करीश्मा  दिसून आला आहे.  मतमोजणी सुरू असून किती जागा मनसेला मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, मालेगाव आणि चंद्रपूर येथे खातं उघडून आपण पालिकेत आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राज्यात आता ग्रामीण  भागात मनसेने आपले जाळे पसरविण्यात यशस्वी होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मुंबई, ठाणे, केडीएमसी, नाशिक, पुणे या प्रमुख पालिकेत आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक, खेड आणि वणी या पालिकेत मनसेची सत्ता आहे. तर काही ठिकाणी जिल्हा परिषदेतही आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. औरंगाबाद, ठाणे आणि नाशिकमध्ये  मनसेनेने आपली ताकत दाखवून दिली आहे. तर केडीएमसी आणि पुण्यात विरोधांची भूमिका बजावली आहे. आता पाच पालिका निवडणुकीत मनसेला यश मिळत असल्याने पक्षाची ताकत वाढण्यास मदत झाली आहे.