यंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!
2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया.
Jul 14, 2014, 08:56 AM ISTमेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी
अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं.
Jul 14, 2014, 08:45 AM IST24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता
अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
Jul 14, 2014, 08:23 AM ISTकोस्टा रिका सरप्राईज पॅकेज, क्वार्टर फायनलमध्ये दाखल
2014च्या वर्ल्डकपमध्ये कोस्टा रिका सरप्राईज पॅकेज ठरली आहे. आता नॉक आऊट राऊंडमध्ये कोस्टा रिकाला ग्रीसचं आव्हान मोडित काढावा लागेल. ग्रीसविरुद्ध त्यांच्या टीमलाच सर्वाधिक पसंती देण्यात येतेय. त्यामुळं क्वार्टर फायनलमध्ये पहिल्यांदाच दिमाखात प्रवेश करण्यासाठी कोस्टा रिकाची टीम आतूर असेल.
Jun 30, 2014, 10:02 AM ISTमॅक्सिकोला हरवत नेदरलँड्सची क्वार्टर फायनलमध्ये धडक
नेदरलँड्सनं अखेरच्या आठ मिनिटांमध्ये दोन गोल डागून मॅक्सिकोवर 2-1 असा सनसनाटी विजय मिळवलाय. नेदरलँड्सनं फिफा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय.
Jun 30, 2014, 09:38 AM ISTकोलम्बियानं उरुग्वेला 2-0नं हरवलं, क्वार्टर फायनलला धडक
कोलम्बियानं उरुग्वेला नॉक आऊट पंच देत फुटबॉल वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. फुटबॉल वर्ल्ड कपचा फाईंड ठरलेल्या हॅमेज रॉड्रीगेजनं दोन गोल झळकावत आपल्या टीमला पहिल्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता कोलम्बियाचा क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल तो यजमान ब्राझिलियन टीमशी.
Jun 29, 2014, 10:43 AM ISTब्राझिलच्या नेमारनं केली पेलेच्या विक्रमाशी बरोबरी
फीफा वर्ल्डकपच्या सामन्यात ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारनं अप्रतिम खेळ करत कॅमरून विरुद्ध ४-१ अशी मात दिली. या विजयामुळं ब्राझिल त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून नेमारनं देखील महान फुटबॉलपटू पेलेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यंदा साऱ्यांचंच लक्ष नेमारच्या खेळाकडे लागलंय.
Jun 24, 2014, 03:19 PM IST