कोलम्बियानं उरुग्वेला 2-0नं हरवलं, क्वार्टर फायनलला धडक

 कोलम्बियानं उरुग्वेला नॉक आऊट पंच देत फुटबॉल वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. फुटबॉल वर्ल्ड कपचा फाईंड ठरलेल्या हॅमेज रॉड्रीगेजनं दोन गोल झळकावत आपल्या टीमला पहिल्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता कोलम्बियाचा क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल तो यजमान ब्राझिलियन टीमशी. 

AFP | Updated: Jun 29, 2014, 10:43 AM IST
कोलम्बियानं उरुग्वेला 2-0नं हरवलं, क्वार्टर फायनलला धडक title=

रिओ दी जानेरो: कोलम्बियानं उरुग्वेला नॉक आऊट पंच देत फुटबॉल वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. फुटबॉल वर्ल्ड कपचा फाईंड ठरलेल्या हॅमेज रॉड्रीगेजनं दोन गोल झळकावत आपल्या टीमला पहिल्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. आता कोलम्बियाचा क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल तो यजमान ब्राझिलियन टीमशी. 

जेव्हा उरुग्वे आणि कोलम्बिया यांच्यातील राऊंड ऑफ 16ची मॅच संपली. त्यावेळी प्री-मॅचला जो फोकस उरुग्वेच्या लुईस सुआरेझवर होता. तो फोकस शिप्ट होऊन बोस्ट मॅचला कोलम्बियन किंग हॅमेज रॉड्रीगेजवर आला. ज्या टीमकडून टॉप 16मध्येही पोहचण्याची अपेक्षा नव्हती. त्या टीमनं क्वार्टर फायनल गाठली. हॅमेज रॉड्रीगेज हा कोलम्बियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं या मॅचमध्ये दोन गोल केले.

मॅचच्या 28व्या मिनिटाला 25 यार्डवरून गोल करत कोलम्बियाला 1-0नं महत्त्वूपर्ण आघाडी मिळवून दिली. रॉड्रीगेजचा हा गोल या फुटबॉल वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम गोल ठरला. यानंतर 50व्या मिनिटाला कुडार्डोच्या हेडरवर रॉड्रीगेजनं गोल झळकावत आपल्या टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रॉड्रीगेजचा या टुर्नामेंटमधील हा पाचवा गोल ठरला. गोल्डन बूटच्या रेसमध्ये नेमार, मेसी आणि थॉमस मुलरसारख्या फुटबॉलपटूंची चर्चा रंगतेय आणि रॉड्रीग्ज या रेसमध्ये असेल याचा साधी कोणी विचारही नव्हता केला. मात्र, पाच गोल करत रॉड्रीगेज गोल्डन बूटच्या रेसमध्ये आता अव्वल स्थानी आहे.

2002नंतर चारही मॅचमध्ये गोल झळकावणार पहिला फुटबॉलर ठरलाय. चारही मॅचमध्ये गोल करत आता रॉड्रीग्जे रोनाल्डो आणि रिवाल्डो या ब्राझिलियन सुपरस्टार्सच्या पंक्तीत जाऊन बसलाय. कोलम्बिया आणि रोड्रीग्जेज आता फुटबॉलच्या दुनियेत नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.