ब्राझिलच्या नेमारनं केली पेलेच्या विक्रमाशी बरोबरी

फीफा वर्ल्डकपच्या सामन्यात ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारनं अप्रतिम खेळ करत कॅमरून विरुद्ध ४-१ अशी मात दिली. या विजयामुळं ब्राझिल त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून नेमारनं देखील महान फुटबॉलपटू पेलेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यंदा साऱ्यांचंच लक्ष नेमारच्या खेळाकडे लागलंय.

AFP | Updated: Jun 24, 2014, 03:19 PM IST
ब्राझिलच्या नेमारनं केली पेलेच्या विक्रमाशी बरोबरी  title=

ब्राझिलीया: फीफा वर्ल्डकपच्या सामन्यात ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारनं अप्रतिम खेळ करत कॅमरून विरुद्ध ४-१ अशी मात दिली. या विजयामुळं ब्राझिल त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून नेमारनं देखील महान फुटबॉलपटू पेलेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यंदा साऱ्यांचंच लक्ष नेमारच्या खेळाकडे लागलंय.

नेमारनं या वर्ल्डकपमध्ये ४ गोल केले आहेत. आपल्या पहिल्याच वर्ल्डकपमधील पहिल्या तीन सामन्यांत असा पराक्रम करणारा तो दुसराच खेळाडू आहे. नेमारच्या आधी असा प्रराक्रम केवळ ब्राझिल फुटबॉलपटू पेलेनं केला आहे. नेमारनं वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात क्रोएशिया विरोधात दोन गोल केले होते. त्यानंतर मॅक्सिकोच्या सामन्यात मात्र त्याला गोल डागता आला नव्हता, मात्र कॅमरून विरुद्धच्या सामन्यात नेमारनं पुन्हा एकदा आपला जबरदस्त खेळ दाखवून दिला. 

त्यानं १७ व्या मिनिटाला ब्राझिलकडून पहिला गोल झळकावला. यानंतर कॅमरून संघाकडून २६ व्या मिनिटाला ब्राझिल विरोधात गोल करण्यात आला. यानंतर नेमार पुन्हा आक्रमक झाला आणि त्यानं ३५व्या मिनिटाला गोल करत ब्राझिलला २-१ अशा आघाडी मिळवून दिली. नेमारनं झळकावलेले गोल हे कॅमरून संघावर दबाव कामय ठेवण्यासाठी महत्वाचं ठरलंय. नेमारच्या या आक्रमक खेळामुळंच त्याची तुलना पेलेच्या खेळाशी केली जाते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.