मॅक्सिकोला हरवत नेदरलँड्सची क्वार्टर फायनलमध्ये धडक

नेदरलँड्सनं अखेरच्या आठ मिनिटांमध्ये दोन गोल डागून मॅक्सिकोवर 2-1 असा सनसनाटी विजय मिळवलाय. नेदरलँड्सनं फिफा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय.

AFP | Updated: Jun 30, 2014, 09:39 AM IST
मॅक्सिकोला हरवत नेदरलँड्सची क्वार्टर फायनलमध्ये धडक title=

फोर्टालेझा: नेदरलँड्सनं अखेरच्या आठ मिनिटांमध्ये दोन गोल डागून मॅक्सिकोवर 2-1 असा सनसनाटी विजय मिळवलाय. नेदरलँड्सनं फिफा विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय.

या मॅचमध्ये हुंटेलारनं एन्जुरी टाईममध्ये मारलेली पेनल्टी किक नेदरलँड्सच्या विजयात निर्णायक ठरली. या मॅचमध्ये सँतोसनं 48व्या मिनिटाला गोल मारुन मॅक्सिकोला आघाडी मिळवून दिली. मेक्सिकोनं ती 88व्या मिनिटापर्यंत टिकवली.

वेस्ली श्नायडरने 88व्या मिनिटाला गोल करून नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली, तर हुंटेलारनं 94व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल डागून नेदरलँड्सच्या 2-1 अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह नेदरलँड्सनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.