bmc

२९ मार्चला सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेचा 2017-18 या वर्षीचा अर्थसंकल्प येत्या बुधवारी, 29 मार्चला स्थायी समिती सभेत सादर केला जाणार आहे. दरवर्षी फुगवून अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र यावेळी पहिल्यांदाच ही परंपरा मोडीत काढली जाणार असून यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा 10 हजार कोटी रूपयांनी कमी असणार आहे.

Mar 25, 2017, 08:52 AM IST

मुंबईत 10 टक्के पाणीकपात, या भागात कमी पाणी

 शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Mar 22, 2017, 07:58 AM IST

'बेस्ट' पगाराचा पेच तात्पुरता सुटला

बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा बीएमसी आणि बेस्टने तात्पुरता सोडवलाय.

Mar 18, 2017, 10:12 PM IST

व्हिडिओ : पाहा, राणीच्या बागेतलं पेंग्विनचं नवं घर

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पेंग्विन कक्षाचा लोकर्पण सोहळा भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पार पडला. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. शनिवारपासून हा पेंग्विन कक्ष दर्शकांसाठी खुला होणार आहे.

Mar 17, 2017, 08:49 PM IST

नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

Mar 14, 2017, 10:01 PM IST

नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

मुंबई महापालिकेचे महापौर ते विविध समित्यांचे होणाऱ्या अध्यक्षांची नावे पाहता ही सर्व नावे फारशी परिचयाची नसलेली दिसतात. शिवसेना नेतृत्वाने मुंबई महापालिकेचे पदाधिकारी नेमताना 'लो प्रोफाईल' नगरसेवकांना संधी दिल्याचं दिसून येतंय. शिवसेनेत अनेक दिग्गज आणि अनुभवी नगरसेवक असतानाही त्यांना डावलून अपेक्षित नसलेली नावे नेतृत्वाने समोर आणून आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Mar 14, 2017, 08:46 PM IST

बेस्ट अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अनिल कोकीळ यांचा उमेदवारी अर्ज

बेस्ट अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बेस्टचा कर्मचारी बेस्टचा चेअरमन होणार आहे.

Mar 14, 2017, 11:11 AM IST

सातमकर यांचा पत्ता कापल्याने तडक पालिकेतून बाहेर पडले

महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नावे निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेवटच्या क्षणी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळे मंगेश सातमकर आणि शीतल म्हात्रे यांचा पत्ता कापला गेला. यामुळे सातमकर नाराज होऊन थेट पालिकेतून बाहेर पडलेत.

Mar 10, 2017, 04:11 PM IST

मुंबई स्थायी समिती निवडणूक बिनविरोध, सातमकर-म्हात्रे यांचा पत्ता कापला

महापालिका स्थायी समितीसह सर्व अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असली, तरी आयत्या वेळी मातोश्रीवरून आलेल्या आदेशांमुळं नावांची अदलाबदल झाली. त्यामुळे मंगेश सातमकर आणि शीतल म्हात्रे यांचा पत्ता कापला गेला.

Mar 10, 2017, 03:58 PM IST

मुंबई महापालिका तिरोजीच्या चाव्या कोणाकडे?

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता लागली आहे. 

Mar 9, 2017, 11:39 PM IST

मुंबई पालिकेत बाळासाहेब... बाळासाहेब... मोदी मोदी घोषणायुद्ध

मुंबई महापालिकेच्या सभागृहात घोषणाबाजीची जुगलबंदी पाहायला मिळाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण थोडे गरम झालेले दिसून आले.

Mar 8, 2017, 11:29 PM IST

मुंबई पालिकेवर भगवा, पण महापौरांसमोर अडथळ्यांच्या शर्यत

महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा कायम राखण्यात अखेर शिवसेनेला यश आलं. भविष्यातल्या अडथळ्यांच्या शर्यतीचीही चुणूक पाहायला मिळाली. 

Mar 8, 2017, 08:25 PM IST

मुंबई महापालिका : स्थायी समिती सदस्यांची यादी

एक सदस्याची निवड अजून होणार आहे. मुंबई महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. 

Mar 8, 2017, 08:20 PM IST