bmc election

युती तुटूनही सरकारला धोका नाही - दानवे

 याआधी शिवसेना भाजप युती अनेकदा तुटली मात्र सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतरही सरकारला कोणताही धोका नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

Feb 8, 2017, 07:36 PM IST

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - नारायण राणे

 शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागले तर तो साधे मासं खात नाही... त्यांना पैशाची चटक लागली आहे, त्यामुळे पाच वर्ष सत्तेचे रक्त पिणार असल्याने ते सत्ता सोडत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात केला आहे. 

Feb 8, 2017, 06:35 PM IST

मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना

"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही. 

Feb 6, 2017, 05:08 PM IST

उंची कमी असली, तरी कामाची तळमळ मोठी

निवडणुकांच्या रणधुमाळीत आजवर तुम्ही विविध प्रकारचे उमेदवार पाहिलेयत. पण आज आपण असा उमेदवार पहाणार आहोत ज्याची उंची लहान असली तरी कामाची तळमळ मात्र मोठी आहे.  

Feb 5, 2017, 01:12 PM IST

भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

मुंबईत भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटतोय... प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईतले तमाम नेते, मंत्री दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मारकावर जमतील. 

Feb 5, 2017, 12:17 PM IST

प्रतीक्षा घुगेंचा एकाच दिवसांत तीन पक्षांमध्ये प्रवास

महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम-गयारामचा सुळसुळाट होता. मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदलाय. 

Feb 4, 2017, 03:59 PM IST

शर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. 

Feb 4, 2017, 01:57 PM IST

तृतीयपंथीय समाजातल्या प्रिया पाटील लढवणार निवडणूक

कलिनातील 166 क्रमांकाच्या वॉर्डातून तृतीयपंथिय समाजातल्या प्रिया पाटील या निवडणूक लढणार आहेत. 

Feb 4, 2017, 10:18 AM IST