तृतीयपंथीय समाजातल्या प्रिया पाटील लढवणार निवडणूक

कलिनातील 166 क्रमांकाच्या वॉर्डातून तृतीयपंथिय समाजातल्या प्रिया पाटील या निवडणूक लढणार आहेत. 

Updated: Feb 4, 2017, 10:18 AM IST
तृतीयपंथीय समाजातल्या प्रिया पाटील लढवणार निवडणूक title=

मुंबई : कलिनातील 166 क्रमांकाच्या वॉर्डातून तृतीयपंथिय समाजातल्या प्रिया पाटील या निवडणूक लढणार आहेत. 

'किन्नर मा' या तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्य़ा संस्थेसाठी प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून त्या काम करतात. 

तृतीयपंथियांसाठी समाजात असलेले गैरसमज दूर करणे, तसंच या समाजाला परंपरेच्या जोखडातून मुक्त करत न्याय मिळवून देणे हे आपले निवडणूक लढण्यामागे उद्दीष्ट असल्याचं प्रिया पाटील म्हणाल्या. 

166 या कलिनातल्या वॉर्डात पाटील यांचा सामना भाजपच्या सुनील खातू यांच्याशी होणार आहे.