Mahim Results 2024 Updates : मी वचन देतो की...; अमित ठाकरे यांनी निकालानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी

Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: महेश सावंत यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर हा पराभव मान्य, पण....; पहिली प्रतिक्रिया देत अमित ठाकरे काय म्हणाले? पाहा

सायली पाटील | Updated: Nov 23, 2024, 04:52 PM IST
Mahim Results 2024 Updates : मी वचन देतो की...; अमित ठाकरे यांनी निकालानंतर दिलेली पहिली प्रतिक्रिया जशीच्या तशी title=
(छाया- अमित ठाकरे फेसबुकवरून साभार)/ Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates mahim Constituency Vidhan Sabha Nivadnuk Nikal amit thackeray first reaction post defeat

Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: माहिम मतदारसंघातील यंदाची लढत बहुचर्चित ठरली. निमित्त होतं तो म्हणजे सुरुवातीपासून महायुतीमध्ये या जागेवरून असणारा गोंधळ. सदा सरवणकर यांचं या मतदारसंघातील मागील काही वर्षांमध्ये असणारं वर्चस्व पाहता ते स्वत: या मतदारसंघातील जागेसाठी आग्रही होते. तिथून मनसेनं अमित ठाकरे यांना उमेदवारी देत एक नवखं नेतृत्त्वं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. प्रकाशझोतया दोन्ही उमेदवारांकडे असतानाच बाजी मारली ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या महेश सावंत यांनी. 

महेश सावंत यांनी माहिमच्या मतदारसंघात विजय मिळवत अमित ठाकरे आणि सदा सरवणकरांचं आव्हान संपुष्टात आणलं. या निवडणुकीत अमित ठाकरे हे या मतदारसंघातील तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. पण, आपला हा पराभव खचवणारा नसून, खूप काही शिकवणारा आहे, अशीच पहिली प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 

हेसुद्धा वाचा : Mahim Results 2024 Live Updates : महेश सावंत विजयी; माहिममध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, 'राज'पुत्र पराभूत

Mahim Results 2024 Updates

 

काय म्हणाले अमित ठाकरे? वाचा संपूर्ण प्रतिक्रिया जशीच्या तशी 

''माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…
आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. 
गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे.
माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं.
आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे.
ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही.
मी वचन देतो, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन; कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!
आपलाच,
अमित ठाकरे''