bmc election

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगूल आज वाजण्याची शक्यता

मुंबई-पुणे-नाशिक-नागपूरसह राज्यातल्या दहा महापालिकांच्या निवडणूकांचा कार्यक्रम आजच जाहीर होण्याची दाट शक्यताय. 

Jan 9, 2017, 07:54 AM IST

भेंडी बाजारातून मुस्लिम तरुणी लढवणार निवडणूक

शिकलेली तरुण पिढी राजकारणात येत नाही अशी तक्रार कायम केली जाते. पण मुंबईत चक्क वैद्यकीय अभ्यासक्रमात गोल्ड मेडलिस्ट तरुण मुलगी  महानगरपालिका निवडणूकीत उभी राहणार आहे. ते ही भेंडी बाजार सारख्या परिसरातून...तिच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी दिपाली जगताप पाटील यांनी....

Jan 2, 2017, 10:05 PM IST

शिवसेना-मनसेत नवा वाद

मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेमध्ये नवा वाद उफाळून आलाय. आज महापालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होतंय. पण शिवसेनेनं मनसेची संकल्पना चोरल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी केलाय. 

Jan 2, 2017, 11:21 AM IST

युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी अन्यथा...- दानवे

युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आहेत, युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी, अन्यथा स्वबळावर लढावे असं आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.  

Oct 21, 2016, 01:58 PM IST

झोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला

शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली. 

Oct 20, 2016, 06:20 PM IST

युतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा

एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Oct 20, 2016, 06:04 PM IST

आगामी निवडणुकीत सेना स्वबळावर, उद्धव ठाकरेंचे संकेत

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Oct 20, 2016, 03:13 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेत दुरावा...

पालिका निवडणूकीच्या तोंडावर सेना आणि भाजपमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चाललीय. आज दादरच्या अग्निशमन केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकापर्णाच्या सोहळ्याला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारलीय.

Oct 19, 2016, 04:45 PM IST