blast

मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

May 24, 2015, 08:58 AM IST

चेंबूरमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार

चेंबूरमधील गडकरी मार्गावर मंगळवारी सकाळी पेट्रोल टँकरचा स्फोट  झाला. यात टँकरच्या क्लिनरसह वेल्डिंग करणाऱ्याचा मृत्यू झाला.  या स्फोटात एक जण जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटानंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

May 19, 2015, 04:15 PM IST

अंतराळातच फुटली अमेरिकेची 20 वर्षांपूर्वीची सॅटेलाईट!

अंतराळात एक नवा धोका उद्भवलाय. अमेरिकन डिफेन्स सॅटलाईट अंतराळातच फुटलीय. त्यामुळे, पृथ्वीलाही त्याचा धोका निर्माण झालाय. 

May 7, 2015, 06:16 PM IST

सातारा जिल्ह्यात जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात ३ ठार

जिल्ह्यातील माणमध्ये जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात ३ जण ठार झाले आहेत, साठवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाल्याने तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर तीन जण जखमी आहेत, जखमींवर जवळच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jan 9, 2015, 02:29 PM IST

बंगळुरू स्फोट हा दहशतवादी हल्लाच – किरण रिजीजु

बंगळुरुमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु यांनी म्हटलंय. या स्फोटामागे सिमीचा हात असण्याची शक्यताही रिजीजु यांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर देशभर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती रिजीजु यांनी दिलीय.

Dec 29, 2014, 10:58 AM IST

इंफाळ 'आयईडी'च्या बॉम्बस्फोटानं हादरलं, तीन ठार

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्यानं परिसर हादरून निघाला. 'आयईडी'च्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती मिळतेय. 

Dec 21, 2014, 11:36 AM IST

वाघा बॉर्डरवर भीषण आत्मघाती स्फोट, ५५ ठार, शेकडो जखमी

पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५५ जण ठार, तर २००हून अधिक जण जखमी झाले आहेत. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोरानं या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटानं उडविलं. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

Nov 3, 2014, 06:59 AM IST