चेंबूरमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार

चेंबूरमधील गडकरी मार्गावर मंगळवारी सकाळी पेट्रोल टँकरचा स्फोट  झाला. यात टँकरच्या क्लिनरसह वेल्डिंग करणाऱ्याचा मृत्यू झाला.  या स्फोटात एक जण जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटानंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

Updated: May 19, 2015, 07:35 PM IST
चेंबूरमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, २ ठार title=

मुंबई : चेंबूरमधील गडकरी मार्गावर मंगळवारी सकाळी पेट्रोल टँकरचा स्फोट  झाला. यात टँकरच्या क्लिनरसह वेल्डिंग करणाऱ्याचा मृत्यू झाला.  या स्फोटात एक जण जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटानंतर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

चेंबूर येथील गडकरी मार्गावरील ओम साई गॅरेजमध्ये एका रिकाम्या टँकरवर वेल्डिंगचे काम सुरु होते. गॅरेजच्या जवळून जाणाऱ्या उच्च दबावाच्या वायरचा संपर्क झाल्याने स्फोट झाला. तर गॅरेजमधील एक कामगार जखमी झाला. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.