इंफाळ 'आयईडी'च्या बॉम्बस्फोटानं हादरलं, तीन ठार

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्यानं परिसर हादरून निघाला. 'आयईडी'च्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती मिळतेय. 

Updated: Dec 21, 2014, 11:36 AM IST
इंफाळ 'आयईडी'च्या बॉम्बस्फोटानं हादरलं, तीन ठार  title=

इंफाळ : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्यानं परिसर हादरून निघाला. 'आयईडी'च्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची माहिती मिळतेय. 
या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत. जखमींपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय.  

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोच आयईडीच्या साहाय्यानं घडवला गेलाय. या स्फोटात दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. इंफाळच्या गर्दीच्या भागात झालेल्या या जोरदार स्फोटांमुळे जखमी झालेल्यांना जवळच्याच हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय.   

पोलिसांनी या स्फोटाची चौकशी सुरु केलीय. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा स्फोट घडवून आणण्यामागच्या कारणांचाही शोध सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या आठवड्यातही इथं एक बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात एक जण ठार झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.