सातारा जिल्ह्यात जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात ३ ठार

जिल्ह्यातील माणमध्ये जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात ३ जण ठार झाले आहेत, साठवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाल्याने तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर तीन जण जखमी आहेत, जखमींवर जवळच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Updated: Jan 9, 2015, 02:51 PM IST
सातारा जिल्ह्यात जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात ३ ठार title=

सातारा : जिल्ह्यातील माणमध्ये जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात ३ जण ठार झाले आहेत, साठवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाल्याने तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर तीन जण जखमी आहेत, जखमींवर जवळच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोथे गावातील डोंगरावर पवनचक्की कंपनीच्या कार्यालयात हा स्फोट झाला, हा स्फोट आज सकाळी अकराच्या सुमारास झाला. या घटनेत ३ जण ठार झाले आहेत. 

साठवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाल्याने माणच्या टेकड्यांवर प्रचंड धूर दिसून आला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.