badlapur

बदलापूर दामले प्रकरणात तक्रारदारच अडचणीत

बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले प्रकरणात आता तक्रारदारच अडचणीत येण्याची शक्यता आहे. तक्रारदार नरेश रत्नाकर आणि ओंकार रत्नाकर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगर न्यायालयानं दिलेत.

Aug 27, 2015, 04:43 PM IST

बदलापूर इथं महिलेची ४ वर्षीय मुलासह आत्महत्या

बदलापूरमधील एका महिलेनं आपल्या ४ वर्षीय मुलासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलीय. बदलापूरच्या बेलवली भागातील ग्रीन लॉन्स या कॉम्प्लेक्समध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

Jul 6, 2015, 09:23 PM IST

आशिष दामले फरार, सात जणांना अटक

बदलापूरमधील राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आलीय. याप्रकरणी आणखी सहा जणांना अटक करण्यात आलीय. मात्र, दामले फरार आहे.

Jun 5, 2015, 09:21 AM IST

दामले याच्या गुंडगिरीवर तीव्र प्रतिक्रीया, अटक का नाही?

राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले याच्या गुंडगिरीवर सत्ताधारी शिवसेना-भाजपमधून तीव्र प्रतिक्रीया उमटलीये. अद्याप त्याला अटक का केली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jun 4, 2015, 11:18 AM IST

राष्ट्रवादीचे नगरसेवक आशिष दामले यांच्यावर दरोडा, दंगलीचा गुन्हा दाखल

बदलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झालाय. त्यांना शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दांमलेंविरोधात दााखल झालेत. 

Jun 3, 2015, 12:24 PM IST

मोबाईची चोरी झाली आणि...आयडियाची कल्पना!

मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर आपण काय करतो..? पोलीस तक्रार नोंदवतो आणि फोन परत मिळण्याची वाट बघत बसतो. किंवा नवा फोन घेऊन मोकळे होतो. पण बदलापूरच्या एका तरूणानं मात्र आयडियाची कल्पना लढवली आणि मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले.

May 28, 2015, 12:16 PM IST

भाजपचे किसन कथोरे यांच्या गडात सेनेचा भगवा

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेनं सत्ता काबिज केलीय. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत भाजपने विशेषतः आमदार किसन कथोरे यांनी प्रतिष्ठेची लढत केली होती. 

Apr 23, 2015, 10:44 PM IST

अंबरनाथ, बदलापुरात शिवसेनेची मुसंडी; अपक्षांच्या साथीने सत्ता

 अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवलीय. बदलापूरमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालंय. तर अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तास्थापनेपासून तीन जागा दूर आहे. पण अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापना करणं शिवसेनेसाठी सहज शक्य होणार आहे. 

Apr 23, 2015, 08:19 PM IST