बदलापूर: बदलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झालाय. त्यांना शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दांमलेंविरोधात दााखल झालेत.
बदलापूरपासून जवळ असलेल्या इनगावमध्ये नरेश रत्नाकर यांच्या घरात काल रात्री ११च्या सुमारास २०-२५ कार्यकर्त्यांसह दामले घुसले. रत्नाकर यांच्याकडील बंदूक हिसकावून घेत दामलेंनी धमकावल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे हा प्रकार घडला त्यावेळी दामले यांच्या सुरक्षेत असलेले दोन पोलीसही त्यांच्यासोबत होते.
दामले १ लाख रुपये घेऊन गेल्याचा आरोपही रत्नाकर यांनी केलाय. हा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. पोलीस अधीक्षक या प्रकरणी अधिक तपास करतायत. दरम्यान, दांमलेंची बाजू ऐकून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यांचा मोबईल बंद आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.