बदलापूर इथं महिलेची ४ वर्षीय मुलासह आत्महत्या

बदलापूरमधील एका महिलेनं आपल्या ४ वर्षीय मुलासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलीय. बदलापूरच्या बेलवली भागातील ग्रीन लॉन्स या कॉम्प्लेक्समध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

Updated: Jul 6, 2015, 09:23 PM IST
बदलापूर इथं महिलेची ४ वर्षीय मुलासह आत्महत्या title=

बदलापूर: बदलापूरमधील एका महिलेनं आपल्या ४ वर्षीय मुलासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलीय. बदलापूरच्या बेलवली भागातील ग्रीन लॉन्स या कॉम्प्लेक्समध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

उषाबेन जाडेज्या आणि मुलगा अजय अशी मृत झालेल्या दोघांची नावं आहे. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. उषाबेन या आपला मुलगा अजय याला क्लाससाठी घेऊन जाते असं म्हणून घरातून बाहेर पडल्या, मात्र त्या अजयला क्लासला घेऊन न जाता आपल्या ७ मजली इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेल्या आणि तिथूनच त्यांनी मुलगा अजय सह खाली उडी मारली. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय.

उषाबेन यांचे पती विजय याचे भांडूप इथं किराणा मालाचं दुकान आहे. उषाबेन ह्यांना फिट येण्याचा आजार होता असं सासरकडील लोकांचं म्हणणं आहे. एक महिन्यापूर्वीच जाडेज्या कुटुंबीय बदलापुरात राहायला आले होते. बदलापूर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. उषाबेन यांनी आत्महत्या करण्याचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. मात्र या घटनेन परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.