उल्हासनगर : बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले प्रकरणात आता तक्रारदारच अडचणीत येण्याची शक्यता आहे. तक्रारदार नरेश रत्नाकर आणि ओंकार रत्नाकर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगर न्यायालयानं दिलेत.
अधिक वाचा : राष्ट्रवादीचे आशिष दामले यांच्यावर दरोडा, दंगलीचा गुन्हा
बदलापूरनजिक इंदगाव इथल्या मठात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी दामलेंविरोधात गुन्हा दाखल आहे. मात्र आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. रत्नाकर हे या मठाचे संचालक आहेत.
केतन शेळके नावाच्या व्यक्तीनं रत्नाकर यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी त्यावेळी आपली तक्रार घेतली नसल्यामुळे न्यायालयात तक्रार करावी लागल्याचा दावा शेळकेनं केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.