arvind kejriwal

भाजप, काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मते ‘आप’ला द्या! - केजरीवाल

भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या. पण आपली अमूल्य मतं मात्र आम आदमी पक्षालाच(आप) द्या, असं आवाहन पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे. काँग्रेसनं त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Jan 19, 2015, 08:26 AM IST

किरण बेदी यांचा अखेर भाजपात प्रवेश!

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी आणि दिवस मोजणं आता सुरू झालंय. दिल्लीची लढाई आप आणि भाजपमध्ये होणार हे आता जवळपास सिद्धच झालंय.

Jan 15, 2015, 04:38 PM IST

मोदींची महारॅली : दिल्लीश्वरांना आश्वासने, 'आप'वर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत महारॅली झाली. दिल्लीतल्या रामलीला मैदानात नरेंद्र मोदी यांची महारॅली झाली. 

Jan 10, 2015, 06:03 PM IST

काळा पैसाप्रकरणी केजरीवालांनी जाहीर केली १५ जणांची यादी

काळा पैसा प्रकरणी कारवाई करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप करतानाच काळा पैसा दडवणाऱ्यांमध्ये अंबानी बंधू, नरेश गोयल, यशवर्धन बिर्ला यांचासह आणखी १५ मोठ्या उद्योजकांचा समावेश असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 

Oct 27, 2014, 07:37 PM IST

केजरीवाल यांनी केलं हृतिकच्या 'बँग-बँग'चं कौतुक!

हृतिक रोशनच्या 'बँग-बँग' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या तीन दिवसात सिनेमानं 72 कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. बॉलिवूड स्टारकडून या सिनेमाचे प्रचंड कौतुक होत असताना. या सिनेमा चाहत्यांच्या यादीत अजून एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचं.

Oct 6, 2014, 12:55 PM IST

केजरीवाल यांच्या मुलीच्या FB वॉलवर अश्लील कमेंट

आम आदमी पक्षाचेचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या विरोधात एका व्यक्तीनं तिच्याच फेसबुकवरील फोटोवर अश्लील कमेंट केलीय. या कमेंटमुळं नाराज झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी गाजियाबादमध्ये तक्रार दाखल केली. मात्र केजरीवाल यांनी या घटनेला जास्त हवा न देता अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला माफ करण्याची मागणी केलीय. 

Oct 5, 2014, 04:11 PM IST

भाजपनं दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास

'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय. 

Aug 30, 2014, 01:57 PM IST

अखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.

Jun 14, 2014, 08:32 PM IST

`आप`मधील वाद संपणार, केजरीवाल यांचा प्रयत्न

आम आदमी या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे. त्याआधी आपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र आहेत, असे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाद क्षमण्याची शक्यता आहे.

Jun 7, 2014, 06:23 PM IST

...तर केजरीवाल पुन्हा तुरुंगात जाणार!

नितीन गडकरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आरोप मागे घ्यायला नकार दिलाय.

Jun 6, 2014, 02:57 PM IST

हायकोर्टाच्या सल्ल्यानंतर केजरीवाल बॉन्ड भरण्यास तयार

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सध्या बंद असलेल्या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा काही मिळालेला नाही.

May 27, 2014, 05:54 PM IST

गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आलीय.

May 21, 2014, 04:17 PM IST