मोदींची महारॅली : दिल्लीश्वरांना आश्वासने, 'आप'वर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत महारॅली झाली. दिल्लीतल्या रामलीला मैदानात नरेंद्र मोदी यांची महारॅली झाली. 

Updated: Jan 10, 2015, 11:28 PM IST
मोदींची महारॅली :  दिल्लीश्वरांना आश्वासने, 'आप'वर टीका title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत महारॅली झाली. दिल्लीतल्या रामलीला मैदानात नरेंद्र मोदी यांची महारॅली झाली. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली काबीज करण्यासाठी, भाजपनं कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून मोदींची महत्त्वपूर्ण रॅली झाली. 

यात दिल्लीची सत्ता भाजपच्या हाती देण्याचं आवाहन मोदींनी केलं. यावेळी बोलताना दिल्लीकरांना २४ तास वीज पुरवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं. सोबतच झोपडीधारकांना पक्की घरं देण्याचं वचनही त्यांनी दिलं.
 
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुद्धा दिल्लीतल्या महारॅलीमध्ये आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाषण केलं. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावर निशाणा साधला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.