नवी दिल्ली : हृतिक रोशनच्या 'बँग-बँग' या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या तीन दिवसात सिनेमानं 72 कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. बॉलिवूड स्टारकडून या सिनेमाचे प्रचंड कौतुक होत असताना.
या सिनेमा चाहत्यांच्या यादीत अजून एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचं. आम आदमी पक्षाचेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सिनेमाचं कौतुक केलंय.केजरीवाल यांनी ट्विटर करून सांगितलं की, 'मी आज माझ्या कुटुंबासोबत बँग-बँग पाहण्यासाठी गेलो. हा सिनेमा मला आणि खास करून माझ्या मुलांना खूप आवडला आहे.'
त्यानंतर हृतिक रोशननं ट्विटरवर केजरीवाल यांचे आभार मानले. यापूर्वी अनेक सेलिब्रिटीजनी हृतिक आणि कतरिनाचं अभिनंदन केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.