arvind kejriwal

मोदींना पंतप्रधानपदी पसंती नाही, 'केजरी' यूटर्न

`जर माझ्या डोक्याला कुणी बंदूक लावली... तरच पंतप्रधान म्हणून मी नरेंद्र मोदींना पसंती देईन` असं `आप`चे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं...

Mar 14, 2014, 02:47 PM IST

केजरीवालांची मीडियाला पहिले धमकी, आता घुमजाव!

आपचं सरकार आल्यास मीडियाला जेलमध्ये टाकणार अशी धमकी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मीडियाला धमकी दिलीय. नागपूरमध्ये काल `डिनर विथ केजरीवाल` कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. १० हजार रुपये घेऊन हा उपक्रम पक्षानं राबवला होता. त्याच कार्यक्रमात केजरीवाल यांनी ही धमकी दिलीय.

Mar 14, 2014, 11:13 AM IST

आपच्या बेशिस्तीनं मुंबईकर त्रस्त!

आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठलं. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

Mar 12, 2014, 03:26 PM IST

मोदींच्या चहानंतर `डिनर विथ केजरीवाल`

निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी आपने `डिनर विथ केजरीवाल` हा फंडा काढला. पण केजरीवाल यांच्यासोबत डिनर करायचं असेल तर आपल्या खिशातून तब्बल १० हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

Mar 12, 2014, 10:25 AM IST

`आम आदमी` आज मुंबई दौऱ्यावर...

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ते मुंबईत येत आहेत.

Mar 12, 2014, 09:44 AM IST

व्हिडिओ : केजरीवालांचं `मीडिया फिक्सिंग` उघड

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एक व्हिडिओनं यूट्यूबवर सध्या खळबळ उडवून दिलीय. या व्हिडिओनंतर केजरीवाल `मीडिया फिक्सिंग` प्रकरणात अडकले आहेत.

Mar 10, 2014, 11:41 PM IST

केजरीवालांकडून जिवंत आरटीआय कार्यकर्त्यांना श्रद्धांजली

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी चुकून ३ जिवंत आरटीआय कार्यकर्त्यांना श्रद्धांजली दिली आहे. या मुद्यावरून सोशल मीडियावर विरोधकांनी केजरीवाल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

Mar 10, 2014, 02:22 PM IST

मोदींच्या भेटीआधी केजरीवालांना पोलिसांनी रोखले

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी १६ प्रश्‍नांची एक यादी घेऊन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल गुजरातकडे रवाना झालेत. मात्र, परवानगी घेतली नसल्याचे कारण देऊन पोलिसांनी त्यांना सिमेवरच रोखले. त्यामुळे मोदींची भेट टळल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

Mar 7, 2014, 03:37 PM IST

आप नेते आशुतोष, शाझिया इल्मी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयाबाहेरील गोंधळ प्रकरणी आप नेते आशुतोष यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
बुधवारी भाजपच्या कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती.

Mar 6, 2014, 04:22 PM IST

केजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?

अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.

Mar 6, 2014, 11:04 AM IST

दिल्लीत `भाजप` आणि `आप`चे कार्यकर्ते आमने-सामने

दिल्लीत आप पक्षाचे कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर जमले आहेत. आप आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करतायत.

Mar 5, 2014, 06:54 PM IST

गडकरींच्या याचिकेनंतर केजरीवालना समन्स

दिल्लीच्या एका न्यायालयानं मानहानी प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स जारी केलं आहे.

Feb 28, 2014, 04:23 PM IST

दिल्ली राष्ट्रपती राजवट : भूमिका स्पष्टचे केंद्राला SCचे निर्देश

जनलोकपास विधेयकावरून आक्रमक झालेले तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दिल्लीत राजकीय पेज निर्माण झाला आणि दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र, दिल्लीत लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेत.

Feb 25, 2014, 10:09 AM IST

तयारी लोकसभेची : `आप`चे संभाव्य उमेदवार

अरविंद केजरीवाल यांच्या देखरेखीखाली `आम आदमी पार्टी`नं लोकसभेतही सत्ताधाऱ्यांना धडक देण्याचं ठरवलंय. यासाठी आपच्या लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची एक यादीही जाहीर करण्यात आलीय.

Feb 16, 2014, 04:20 PM IST

गॅस दरवाढ १ एप्रिलपासून दामदुप्पट

नैसर्गिक गॅसची दरवाढ दामदुप्पट होणार आहे. तसे संकेत पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी दिले आहेत. गॅस उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१४ पासून दरवाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही दरवाढ सध्याच्या दराच्या दुप्पट आहे.

Feb 15, 2014, 09:08 AM IST