बिग बींच्या जावयाचे मेल अकाऊंट हॅक
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जावई आणि उद्योगपती निखिल नंदा यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आले. हॅक केलेल्या या मेल अकाऊंटवरून लाखो रूपयांच्या कर्जाची डिमांड करण्यात आली.
Aug 2, 2013, 02:17 PM ISTअमिताभ बच्चनच बॉलिवूडचे बादशाह!
बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहेनशाह असल्याचं स्पष्ट झालंय.. `ब्रिटीश आशियाई साप्ताहिक इस्टर्न आय`ने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभचं सर्वोत्कृष्ट असल्याचं समोर आलंय..
Jul 28, 2013, 05:11 PM ISTआता हटके अमिताभ... बिग बीची नवी इनिंग
नेहमीच काहीतरी नवीन आणि हटके करण्यात बिग बी अमिताभ बच्चन यांचा हात कोणी धरु शकत नाही... आणि आता अमिताभ आणखी एक नवी इनिंग खेळणारेत... कारण, आता बिग बी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Jun 6, 2013, 12:33 PM IST‘बलात्कार करणाऱ्या नराधमांना पब्लिकच्या हवाली करा!’
राजधानी दिल्लीत घडलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून या नराधमांना तुरुंगात नको, ‘पब्लिक’च्या हवाली करा, अशा शब्दांत महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्ली येथील घटनेचा संताप व्यक्त केला आहे.
Apr 21, 2013, 03:31 PM ISTचिमुकली आराध्या बच्चन करोडोंची मालकीण!
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्याची एक वर्षांची चिमुकली आराध्या बच्चन आता करोडोंची मालकीण बनलीय.
Mar 3, 2013, 12:58 PM ISTचिमुकल्या करिनाच्या पायाची माती साफ केली होती बिग बींनी
बॉलिवुडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन हे उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबरीने ते एक चांगले लेखकही आहेत. ७० वर्षीय अमिताभ बच्चन हे नेहमीच आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच सक्रीय असतात. असे असताना आमिताभ आपल्या मागील आठवणींना नेहमीच उजाळा देत असतात. त्यांच्या लेखनाचे काही पैलू नेहमीच आपल्याला सोशल नेटवर्कींग साइटवर पाहायला मिळतात.
Feb 27, 2013, 05:27 PM ISTवाय पी सिंग यांचे अमिताभ-जया बच्चनवर गंभीर आरोप
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे, त्या कंपनीकडून मुंबईत बेकायदेशीर कमर्शियल बिल्डिंग बांधली जात असल्याचा आरोप वाय. पी. सिंह यांनी केला आहे.
Jan 30, 2013, 04:50 PM IST`केबीसी`चा एसएमएस!... जरा संभाळून!
केबीसीच्या हॉटसीटवर बसण्याचं स्वप्नं पाहणा-या एका डॉक्टराला गंडा घालण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये उघड झालाय. या डॉक्टरांना वेळीच संशय आल्यानं, ते फसगतीपासून बचावलेत.
Jan 28, 2013, 08:36 PM ISTबिग बीच्या अपघाताची तारीख गाडीचा नंबर
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.
Jan 17, 2013, 06:36 PM ISTअमिताभला नाना पाटेकरच्या अभिनयाची भूरळ
अमिताभने नाना पाटेकर यांच्या अभिनयाची स्तुती केली. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर अमिताभ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांनी कोहराम नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मात्र आगामी २६/११ या सिनेमातील नाना पाटेकरांचा अभिनय अमिताभ बच्चन यांना विलक्षण भावला आहे.
Jan 9, 2013, 05:13 PM ISTअमिताभ म्हणतात.. `थकलो रे बाबा`
बॉलिवूडचे महानायक अमिताभ यांचा करिश्मा आणि त्यांच्यातील ऊर्जा काही औरच आहे. वयाच्या सत्तरीतही आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त ऑफर्स त्यांना येत आहेत. येत्या 2013 मध्ये अमिताभचे 5 सिनेमे रिलीज होत आहेत. मात्र आता आपण थकल्याचं स्वतः अमिताभ यांनीच मान्य केलंय.
Dec 4, 2012, 03:55 PM ISTबच्चन यांची बाळासाहेबांना काव्यांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपश्चात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपले वडील कवी स्व. हरिवंशराय बच्चन यांची एक कविता बाळासाहेबांना अर्पण केली आहे.
Nov 18, 2012, 08:24 AM ISTबच्चन यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, शारीरिक इजा
अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ट्विट करताना सांगितलं, “होय, मला आणि अभिषेकला धक्काबुक्कीत थोडं खरचटलं. पण आम्ही ठीक आहोत. ‘मातोश्री’वरील डॉक्टरांनी आमच्यावर प्रथमोपचार केले.”
Nov 15, 2012, 10:38 AM IST`मातोश्री`वर राज-अमिताभ समोरा समोर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेबांना सध्या लाइफ सपोर्टिंग सिस्टमवर ठेवण्यात आल्याचं अमिताभ यांना डॉक्टरांकडून समजलं.
Nov 15, 2012, 09:36 AM ISTबाळासाहेबांचे संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच - अमिताभ
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. अमिताभ बच्चन यांनी काल मातोश्रीवर उपस्थिती लावली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय, बाळासाहेब संपूर्ण जीवन योद्ध्यासारखेच जगले.
Nov 15, 2012, 07:37 AM IST