बिग बीच्या अपघाताची तारीख गाडीचा नंबर

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2013, 06:36 PM IST

www.24taas.com,मुंबई
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा नवा वाद पुढे आलाय. अमिताभ यांनी म्हटले आहे की, ती कार माझीच आहे. नात आराध्याची नाही. अभिषेकने आराध्याला भेट दिलेली गाडी हे विधान चुकीचे आहे. मात्र, या गाडीवर अपघाताचा क्रमांक हा, माझ्या अपघाताची तारीख असल्याचे बिग बीने स्पष्ट केलंय.
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या हिला तिच्या पहिल्या वाढदिवशी (१६ नोव्हेंबर २०१२) रोजी भेट म्हणून दिलेली मोटार आराध्याची नाही. ती तर माझी आहे, असे अमिताभ यांनी फेसबुकवर म्हटलं आहे.
ती मोटार माझीच आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त ती मोटारी खरेदी केली आहे. त्या मोटारीवर माझे प्रेम असून, गाडीचा क्रमांक एमएच ०२ सीव्ही २८८२ असा आहे. गाडीच्या क्रमांकाबाबत अमिताभ सांगितलेय, २८८२हा क्रमांक माझ्या आयुष्यातील विशेष आहे. या तारखेचे महत्त्व म्हणजे माझा दुसरा वाढदिवसच आहे. कुली चित्रपटाच्या वेळी २ ऑगस्ट १९८२ रोजी मला अपघात झाला होता. अपघाताची तारीख म्हणजेच २८८२ होय.

अमिताभ बोल
फेसबुकवर पोस्ट केलेला मजकुर
that Abhishek presented a car to Aaradhya on her first birthday ... wrong. NO car was presented, instead a car was purchased by them to gift me on my birthday ... a MiniCooper, which I love, and which has a number plate 2882 ..
And its 2882, because that is a special date too in my life ... my second birthday ! After the Coolie accident it was on the 2nd of Aug 1982 that I had died and revived. 2882 is the 2nd of the 8th month of August in the year `82 ... so 2882 !!