ajmal kasab

कसाबचे येरवड्यात दफन - मुख्यमंत्री

दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आल्याने सर्वत्र संदेश गेला आहे की, या देशात कायद्याचे राज्य आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Nov 21, 2012, 10:37 AM IST

कसाबची शेवटीची इच्छा काहीच नाही

कसाबला आज सकाळी फार गुप्ततेत फाशी देण्यात आली, असली तरी काही बातम्या आता समोर येत आहे. कसाबला फाशी देताना विचारण्यात आले की, अंतीम इच्छा काय आहे. त्यावर त्याने आपली अंतीम इच्छा काहीच नाही, किंवा आपण काय करू इच्छितो असे त्याने काहीच सांगितले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nov 21, 2012, 09:56 AM IST

दहशतवादी कसाबला पुण्यात फाशी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

Nov 21, 2012, 08:46 AM IST

कसाबच्या दयेचा अर्ज गृहमंत्रालयाने फेटाळला

मुंबईत झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी मोहम्मद अजमल कसाबने दिलेली द्या याचिका गृह मंत्रालयाने मंगळवारी रद्द केलीय.

Oct 23, 2012, 07:13 PM IST

कसाबचा दयेचा अर्ज

दहशतवादी अजमल कसाबनं राष्ट्रपतींकडं दयेचा अर्ज केलाय. सुप्रीम कोर्टानं कसाबची फाशीची शिक्षा कायम केलीये. त्यानंतर कसाबनं आज आर्थर रोड तुरुंग अधीक्षकांमार्फत राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केलाय.

Sep 18, 2012, 01:11 PM IST

कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार

दहशतवादाचे भयाण सावट केवळ भारतावरच नव्हे, तर जगभर सगळीकडेच पडलेले आहे. गेल्या दशकभरात ६६ देशांतील लाखो दहशतवाद्यांना अटक करण्यात आली व दहशतवाद्यांना न्यायालयांनी शिक्षाही सुनावल्या. भारताची परिस्थिती मात्र उलटी आहे.

Aug 30, 2012, 12:45 PM IST

कसाबला भरचौकात फाशी द्या – उद्धव ठाकरे

२६/११ च्या मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या अजमल कसाबला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Aug 29, 2012, 05:03 PM IST

कसाबचा हिसाब उद्या!

क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबचा उद्या सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे.. कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबईतल्या 26-11 दहशतवादी हल्लाप्रकरणी कसाब हा दोषी आहे.

Aug 28, 2012, 07:50 PM IST

कसाबची परत चौकशी करणार

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब यांची आर्थर रोड करागृहात पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाहून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू जिंदाल याने केलेल्या खळबळजनक खुलाशांची शहानिशा करण्यासाठी कसाबची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

Aug 8, 2012, 03:30 AM IST

कसाबची झाली 'बकरी'!

२६-११च्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याला आता फक्त शाकाहारी जेवण खावं लागतंय.

May 21, 2012, 10:11 AM IST

कसाबचा हिसाब पेंडिंग

सुप्रीम कोर्टानं कसाबच्या फाशीसंदर्भातल्या याचिकेवरचा निकाल राखून ठेवला आहे. २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणातला एकमेव दहशतवादी अजमल कसाबला हायकोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Apr 25, 2012, 02:18 PM IST

'कसाब'वर खर्च 'बेहिसाब' !

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याजेलमधील सुरक्षा, औषध आणि खाण्यावर आतापर्यंत १६ कोटी ५० लाख रूपये खर्च झाला आहे. कसाब आर्थर जेलमध्ये असून त्याचा खर्च केंद्र सरकारनं करावा, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली होती परंतु केंद्राकडून याबाबत अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

Nov 22, 2011, 01:53 PM IST