मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्याजेलमधील सुरक्षा, औषध आणि खाण्यावर आतापर्यंत १६ कोटी ५० लाख रूपये खर्च झाला आहे.यातील १० कोटी ८७ लाख खर्च हा केवळ कसाबला कारागृहात सुरक्षेसाठी पुरवलेल्या इंडो-तिबेटियन बॉर्डरच्या पोलिसांवर झालाय. २६ तारखेला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत.
कसाब आर्थर जेलमध्ये असून त्याच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस मागवण्यात आलेत. त्याचा खर्च केंद्र सरकारनं करावा, अशी विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली होती परंतु केंद्राकडून याबाबत अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. कसाबच्या खटल्यात सुप्रीम कोर्टातील प्रत्येक सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना ५० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. तसंच या खटल्यासंदर्भातल्या चर्चेसाठीच्या प्रत्येक तासाचे १० हजार रुपये देण्यात येणार आहेत.