विधानसभा 2014

निकालापूर्वीच पृथ्वीबाबांविरोधात नाराजीचा सूर, घमासान सुरू!

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं घमासान सुरू झालंय. पृथ्वीराज काँग्रेसमध्ये 'हिटलिस्ट'वर असतानाच मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी केलेलं विधान त्यांच्या पक्षातील विरोधकांसाठी आयतंच कोलीत देणारं ठरलंय.  

Oct 17, 2014, 04:33 PM IST

जिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?

आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2014, 05:42 PM IST

तुम्हाला राजकारण्यांच्या नावानं शिमगा करायचा हक्क नाही - सलमान

महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 38.33 टक्के तर मुंबईत फक्त 41 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात सामान्य नागरिक अजूनही घरा बाहेर पडलेला नाही. पण मुंबईत अभिनेते आणि कलाकारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर उपस्थिती लावत मतदारांना आवाहन केलं. 

Oct 15, 2014, 04:47 PM IST

गूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल

महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे. 

Oct 15, 2014, 02:20 PM IST

धक्कादायक: झोनल ऑफिसरच्या घरी चार इव्हीएम मशीन्स सापडल्या

वसईमध्ये एका झोनल ऑफिसरच्या घरी एक दोन नाही तर तब्बल चार इव्हीएम मशीन्स सापडल्या आहेत.  अशोक मांद्रे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. वसईच्या गोलानी परिसरातल्या घरी या मशीन्स सापडल्या.

Oct 15, 2014, 01:42 PM IST

विदर्भात मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलीस कर्मचारी ठार, 8 जखमी

सावनेर इथल्या पारशिवनी आवडेघाटातील मतदान केंद्रावर वीज कोसळून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. काही वेळापूर्वी या मतदान केंद्रावर वीज कोसळून काही जण जखमी झाले होते, त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

Oct 15, 2014, 01:15 PM IST

नागपूर: शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा!

निवडणूक रणधुमाळीत युती तुटल्यानंतर वारंवार भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना नेते सोडत नाहीयत. पण भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं पाठिंबा दिलाय. 

Oct 14, 2014, 06:48 PM IST

चव्हाण, पवार, फडणवीस, तावडेंची उमेदवारी रद्द करा - शिवसेना

देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, अजित पवार हे सर्वजण उमेदवार असूनही पक्षाच्या जाहिरातींवर त्यांचा फोटो आहे. त्यामुळं या जाहिरातींच्या खर्चाचा उमेदवारांच्या खर्चात समावेश करावा आणि हा खर्च २८ लाखांपेक्षा अधिक असल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

Oct 14, 2014, 05:03 PM IST